DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर :- महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तर्फे लाचखोरांवरती वारंवार कारवाया होत असून देखील सरकारी अधिकारी मात्र लाच घेतल्याशिवाय काही काम करत नाही असेच चित्र तरी सध्या दिसत आहे.
कोल्हापूर येथील तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजरचुकीने चुलत चुलते यांचे नावे लागली होती ती कमी करण्याकरीता म्हणजेच शेतीबाबतचा फाळणी उतारा (पोट हिस्सा) दुरुस्त करून तक्रारदार यांच्या मालकीची शेतजमीन तक्रारदार आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अन्य सह हिस्सेदार यांच्या नावे लागणेकरता उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे या प्रादेशिक कार्यालयाकडे 2018 मध्ये अर्ज केला होता. या तक्रारदार यांच्या वरील प्रलंबित अर्जाची सुनावणी भूमी अभिलेख अधीक्षक, कोल्हापूर यांच्या समक्ष सुरू करणेबाबत उपसंचालक यांनी जिल्हा अधीक्षक यांना लेखी आदेशित केले होते. त्या सदर सुनावणी चा निकाल हा तक्रारदार यांच्या बाजूने देणेसाठी आरोपी चालक शेळके यांनी स्वतःसाठी 5,000/-₹ व आरोपी जिल्हा अधीक्षक जाधव यांचेसाठी 10,000/-₹ असे मिळुन तक्रारदार यांच्याकडे एकूण 15,000/-₹. लाचेची मागणी केली तसेच आरोपी अधीक्षक जाधव यांनी तक्रारदार यांना चालक शेळके यांना त्यांनी मागणी केलेप्रमाणे पैसे दिले का असे म्हणून चालक शेळके यांनी मागणी केलेल्या लाच मागणीस संमती दिली. त्यानंतर तक्रारदार यांचेकडुन जिल्हा अधीक्षक यांना 10,000/-₹ व चालक शेळके यांना 5,000/-₹ लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले असून आरोपी यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू होती.
सदर कारवाई सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकातील सापळा पथक पोलीस निरीक्षक बापु साळुंके, स.पो.फौ. प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर, पो.ना. सचिन पाटील, पो.ना. सुधीर पाटील, चा.पो.हे.कॉ. सूरज अपराध, चा.पो.हे.कॉ. विष्णू गुरव, ला.प्र.वि.कोल्हापूर यांनी केली.
या कारवाईसाठी वरिष्ठ अधिकारी म्हणून
अमोल तांबे पोलीस अधीक्षक, डॉ. शितल जानवे अपर पोलीस अधीक्षक, विजय चौधरी अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे यांचे
मार्गदर्शन लाभले.