धुळे एसीबीची कारवाई; अक्कलकोस (ता. शिंदखेडा, जि. धुळे) आश्रमशाळेत मुख्याध्यापिका कार्यरत
DPT NEWS NETWORK प्रतिनिधी:- डॉ. मनिष शेवाळे
धुळे – अक्कलकोस (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील शासकिय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बापुराव जगताप यांना चार हजारांची लाच घेताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी मुख्याध्यापिका जगताप यांच्या विरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अक्कलकोस (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील शासकिय माध्यमिक आश्रमशाळेतून माध्यमिक शिक्षक यापदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे गट विमा योजनेचे मंजुर झालेले १ लाख ३३ हजार ८८८ रुपयांचे बिल उपकोषागार कार्यालय, शिंदखेडा येथे पाठविण्यासाठी मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी पाच हजार लाचेची मागणी केली होती. यामुळे तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दुरध्वनीवरून माहिती दिली होती. धुळे एसबीच्या पथकाने दोंडाईचा येथे जाऊन पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती चार हजार स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांच्या विरुध्द दोंडाईचा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी कारवाई केली.
दरम्यान, सदरच्या सदर कारवाईसाठी नाशिक लाचलुचपत प्रतिंबधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.