DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड – गोवंश मांस विकत असल्याच्या कारणावरून बिलोली (जि. नांदेड) येथील एकाविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलोली येथील कुरेशी गल्लीत गोवंश मांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती बिलोली पोलीसांना मिळाली. त्यानुसार कुरेशी गल्लीतील अलीम इमामसाब कुरेशी (वय 26 वर्ष, व्यवसाय खाटीक, राहणार बिलोली) याच्याकडे पोलीसांनी धाड टाकली असता, त्याच्याकडे 21 किलो गोवंशीय मांस व सुरी आढळून आली. याप्रकरणी हवालदार चंद्रमणी जळबाजी सोनकांबळे यांच्या फिर्यादीनुसार बिलोली पोलीस ठाण्यात गु.र.नं.213/2023 कलम 5, 5(अ), 9,10 प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा अधिनियम 1995 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 प्रमाणे गुन्हादाखल करण्यात आला आहे.