नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोंढावळ येथे’क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संस्थेच्या वतीने बालिका दिनानिमित्त विद्यार्थीचा सन्मान

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – रविंद्र गवळे

नंदुरबार:- शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस पी सोनवणे मॅडम हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक जे पी माळी होते ‌उपशिक्षक प्रमोद परदेशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला ते म्हणाले कि पुरुषी मानसिकतेवरचा हा प्रहार तो पण त्या काळात सन १८४८ मध्ये केलेला.स्त्री ला स्वातंत्र्याची जाण करुन देत त्यासाठी संघर्ष करुन ते प्राप्त करुन देणाऱ्या एका क्रांतीज्योतीने इतिहास घडविलाय.शिक्षणा पासून वंचित ठेवून स्त्रियांचे प्रगतीचे पंख कापणाऱ्या समाजात सर्व जातीधर्मासाठी पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. लवकरच मुलींच्या शिक्षणाच्या पाच शाळा उघडल्या.जातीधर्माच्या खुळचट कल्पना नष्ट करण्यासाठी बालिका वसतीगृह सुरू केले.हे कर्तुत्व होते देशातील पहिली महिला शिक्षिका ठरलेल्या सावित्रीबाई फुलेंचे. त्यांची आज जयंती व बालिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी बालिकागृह सुरू केले होते म्हणून ३ जानेवारी हा दिवस ‘बालिका दिन’ म्हणून पण साजरा केला जातो.तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे ९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले.पहिल्या मराठी कवयित्री सावित्रीबाईंनी ज्योतिबा नामक सत्यवानाला समाजसेवेसाठी जन्मभर समर्थ साथ दिली.स्वयंभू समाजसेवेचे व्रत स्विकारलेल्या सावित्रीबाईं शेवटचा श्वास घेतला तो प्लेगच्या पेशंटची सेवा करतानाच.शिक्षणाने स्त्रीच्या जीवनात असे प्रगतीचे दीपक उजळवले की अंधारजाळे दूर झाले.जगाच्या विस्तिर्ण आकाशात आज भारतीय महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रांत मानाने उंचच उंच ठरतोय तो त्यांच्याच योगदानाने. अश्या ह्या ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाईं फुलेंना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन सर्वश्रेष्ठ दान आहे ते ज्ञानाचे. हे असे दान की ते दिल्याने आपलेच ज्ञान वाढते हेच खरे सत्य आहे.ज्ञानमंदिरी हे ज्ञान अज्ञ गोरगरीबांना वाटणे म्हणजे सुंदर जगाची निर्मिती. त्या कष्टाचे प्रेमाचे मोती सरस्वतीच्या गळ्यात सुशोभित होतील.उपस्थित सर्वानीं पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली.यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई विद्यालय वतीने बालिका दिनानिमित्त उपस्थीत विद्यार्थीना प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुत्रसंचलन इयत्ता दहावि च्या विद्यार्थीनी धनश्री माळी व भैरवी गोसावी यांनी केले , आभार प्रदर्शन एम. एम.माळी मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाय.. एस. शिंपी, आर. एच. खैरनार, के. एस. सैंदाणे , आर. डी.माळी, आर. एम. बागुल, एस. डी.बैसाणे यांनी परिश्रम घेतले आदि शिक्षक शिक्षीका उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:58 am, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!