नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

10 हजाराची लाच भोवली लाच घेतांना पोलीस निरीक्षकासह चालक रंगेहात एसीबीच्या जाळ्यात..

नाशिक एसीबी पथकाची कारवाई; पोलीस वर्तुळात खळबळ


DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी- रविंद्र गवळे

नंदुरबार :- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतूक करून देण्याच्या मोबदल्यात दहा हजाराची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षकासह चालक शिपायास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

पोलीस वाहन चालक गणेश गावीत

तक्रारदार सारंखेडा येथे यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचच्या व्यवसाय करावयाच्या असल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील वय (44 ) व चालक पोलीस शिपाई गणेश भामट्या गावित वय 38 यांनी तक्रारदार कडून 21 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दहा हजार रुपये इतकी रक्कम देण्याचे ठरले होते. यादरम्यान तक्रारदारांनी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला ठरल्याप्रमाणे पोलीस शिपाई गणेश गावीत यास 23/12 /2023 रोजी दहा हजाराची लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने रंगे हात पकडले आहे. सदरच्या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ऐन यात्रे उत्सवात सारंगखेडा पोलीस निरीक्षकच एसीबीच्या कारवाईत अडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे वालावकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्यासह सापळा पथकातील पो.हे. कॉ. सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांच्या पथकाने कारवाई करत सापळा यशस्वी केला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:22 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!