DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी- रविंद्र गवळे
नंदुरबार: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग आणि ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडे येथील विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान तीन दिवशीय कार्यशाळा दि. 24 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत घेण्यात आली. दि. 24 जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष मा. पी. बी. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव मा.बी.व्ही. चौधरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. के.एच. चौधरी, माजी प्राचार्य डॉ.एस.पी. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एन.गिरासे व डॉ. विवेकानंद चव्हाण (धुळे जिल्हा समन्वयक विद्यार्थी विकास विभाग) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभा समन्वयक डॉ. के. पी. पाटील यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.पी.बी.पटेल यांनी आपल्या मनोगतातून युवतीनी आत्मनिर्भर कसं व्हावे यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच माजी प्राचार्य डॉ.एस.पी. पाटील यांनी आत्मनिर्भर युवती मुळे विद्यार्थिनींच्या मनामध्ये खंबीर ताकद कशी निर्माण होईल याविषयी संदेश दिला. तसेच डॉ. विवेकानंद चव्हाण यांनी विद्यापीठाचा या कार्यशाळा अभियाना बाबत काय हेतू आहे . याबद्दल मनोगत व्यक्त केले.उध्दघाटनपर सत्राचे आभार प्रकटन विद्यार्थी विकास समन्वयक डॉ. सी. एस. करंके यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ए.एम.गोसावी यांनी केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात दि. 24 जानेवारी रोजी डॉ. विवेकानंद चव्हाण यांनी सोशल मीडिया आणि जनजागृती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडियामुळे विद्यार्थिनींची कशी फसवणूक होते याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात शिवांगी देवरे मॅडम यांनी विद्यार्थिनी आणि आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले आरोग्याची काळजी कशी घ्यावी त्याविषयी अनेक उदाहरणे दिली.
दिनांक 25 जानेवारी रोजी पहिल्या सत्रात सारंखेडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा. लक्ष्मण बी. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनीना साबरक्राईम याविषयी माहिती दिली.तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया बद्दल विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन सावधानता कशी बाळगावी याविषयी सूचना दिल्या त्यातून आत्मनिर्भर कसे होणार यावर प्रकाश टाकला. दुसऱ्या सत्रात सेंट्रल बँक इंडिया शाखा बामखेडे येथील शाखाधिकारी मा. रघूवंशी सर यांनी बँक व्यवहार जनजागृती या विषयावर विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केले. बँकेच्या व्यवहारात कोणकोणत्या प्रकाराची काळजी घ्यावी तसेच बँक व्यवहारात ऑनलाईन कशी फसवणूक होते याबद्दल मार्गदर्शन केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी पहिल्या सत्रात डॉ. इंदिरा गिरासे यांनी युवती आणि शिक्षण याबद्दल मार्गदर्शन केले. यातून विद्यार्थिनींच्या मनात असलेल्या विविध अभ्यासक्रमा बाबत माहिती दिली आणि त्यातून निर्भयता कशी निर्माण होईल याबद्दल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात धनंजय पापड प्रतिष्ठानचे प्रमुख केशव पटेल यांनी विषयी विद्यार्थिनींना आपला व्यवसाय व स्वयंरोजगार कसा वाढवावा आणि त्यातून कुटुंबाला कसा हातभार लागेल आणि निर्भयता कशी निर्माण होईल याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळा समारोप प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एन. गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ.सी.एस. करंके यांनी केले तर आभार प्रगटन युवती सभेचे समन्वयक डॉ.के.पी. पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रा.एस.एस. दुथडे, डॉ.वाय.सी. गावीत, प्रा.एम.एस.
निकुंभे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मतदान जनजागृतीची, तंबाखू मुक्तीची शपथ घेतली यावेळी सहभागी विध्यार्थिनींनी कार्यशाळेतील अनुभवाचे सादरीकरण केले त्यात आरती माळी, तेजस्विनी पटेल, वैशाली पारधी, सविता मराठे, रिता माळी, अश्विनी कोळी इत्यादी विध्यार्थिनींनी आम्हाला या कार्यशाळेतून काय मिळाले व आमच्या भविष्यात यातील अनुभव उपयोगी पडतील अशा भावना व्यक्त केल्या सदर कार्यशाळेत महाविद्यालयातील 51 विद्यार्थिनीनी लाभ घेतला. सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.