DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने
आदिवासी मेळाव्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता यावेळी प्रवेशद्वारावर पाचोरा व भडगाव महसूल कर्मचाऱ्यांच्यावतीने जातीचे दाखले, ईरेशनकार्ड, संजय गांधी योजनेचे विविध लाभ तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे शबरी घरकुल व तत्सम लाभाच्या योजनांचे वेगवेगळे स्टॉल लावून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.
पाचोरा:- आदिवासी बांधव हा येथील मूलनिवासी असून निसर्गतःच बळकट शरीरयष्टी लाभलेल्या समाजाने आता शिक्षणाची कास धरत आपला सर्वांगीण विकास साधावा मी लोकप्रतिनिधी म्हणून सदैव त्यांच्या हाकेला साद देण्यासाठी तयार असून समाजाने योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मध्यस्थ दलालांपासून लांब राहून स्वतः पुढे येऊन शासनाच्या योजनांचा लाभ पदरात पाडून घ्यावा, केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासी बांधवांसाठी अनेक लाभार्थी योजना आहेत. त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी यावलचे आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे उपकार्यालय भडगाव किंवा पाचोरा येथे कार्यान्वित केले जाईल याबाबत आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचे सोबत चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पाचोरा शहरातील मोंढाळा रस्त्यावरील तुळजाई जिनिंगच्या प्रांगणावर महसूल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने व आ. किशोर अप्पा पाटील यांच्या पुढाकाराने सोमवारी (ता. ८) झालेल्या आदिवासी विकास योजना मार्गदर्शन मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी प्रकल्प विकास प्रकल्प संचालक राजेश लोखंडे, यावल प्रकल्प कार्यालयाचे प्रमुख अरुण पवार, अश्वमेध संस्थेचे कैलास मोरे, प्रांताधिकारी भूषण अहिरे उपस्थित होते. आमदार किशोर पाटील पुढे बोलतांना म्हणाले , की आदिवासी समाजबांधवांनी महिलांचे बचत गट वाढवावे. शिक्षणाशिवाय आदिवासी समाजबांधव विकासाच्या प्रवाहात येणार नाहीत. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक लाभार्थी योजनांचा लाभ समाजाला मिळावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आदिवासी व तडवी समाजबांधवांची २० जणांची टीम मिळाली तर येत्या काही वर्षांत आदिवासी समाजबांधवांचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. प्रत्येक गावात आदिवासी समाजबांधवांसाठी दफन विधी व घरकुलासाठी जागा व जातीचे दाखले मिळवून देणार असून दलालांपासून या समाजाची मुक्ती आपण करु असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी साईनाथ सोनवणे यांनी
आदिवासी समाजबांधवांना योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. आमदार किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘जागर
आदिवासींचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ही पुस्तिका राज्यातील मॉडेल ठरणार असल्याचे प्रकल्प संचालकांनी स्पष्ट करून
आमदार किशोर पाटील यांचे कौतुक केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, रावसाहेब पाटील, अरुण पवार, ॲड. रणजीत तडवी, कैलास मोरे, राजेश लोखंडे, भूषण अहिरे
यांनी शासनाच्या विविध लाभार्थी योजनांसंदर्भात माहिती दिली.
*समाजकार्य करणाऱ्यांचा गौरव*
आदिवासी संघटनाच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या साईनाथ सोनवणे, मुराद तडवी, ऍड.रणजीत तडवी, आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष धर्मा भिल ,अफसर तडवी, बबलू तडवी, मनीषा गायकवाड, मुनीर तडवी, रोहिदास भिल, गोरख भिल,मकसुद तडवी, गफूर तडवी, मिलिंद सोनवणे, वजीर तडवी, दादाभाऊ तडवी, मंगला नाईक, रामचंद्र दाभाडे, बापू भिल, विनोद तडवी, गायकवाड, शकूर तडवी, दिलीप भिल, गोरख भिल, गोपीचंद तडवी, अशोक तडवी, रामदास वाघ, कल्पना तडवी, रंगनाथ वाघ, सखुबाई भिल, अजित तडवी,सरपंच मनीषा गायकवाड आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रावसाहेब पाटील, भूषण अहिरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील,आर. ओ. वाघ, तहसीलदार संभाजी पाटील, मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, रवींद्र लांडे, सुमित पाटील, अरुण पवार, सभापती गणेश पाटील,उपसभापती प्रकाश पाटील, माजी जि प सदस्य संजय पाटील, पदमसिंग पाटील,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, शहर प्रमुख किशोर बारवकर, बंडू चौधरी, संदीपराजे पाटील, सुधीर शेलार,महिला आघाडीच्या रत्ना पाटील, साईनाथ सोनवणे, युवराज पाटील, राजेश पाटील, डॉ. विशाल पाटील, अनिल पाटील, बापू हटकर आदी उपस्थित होते. भडगाव तालुक्यातील सुमारे चार हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना या मेळाव्यात विविध योजनांचा लाभ देण्यात येऊन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले प्रवीण ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले तर अनिल धना पाटील यांनी आभार मानले.