DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले
निजामपूर – कर्जदार ने कर्जा चा हप्ता भरण्यासाठी निजामपूर येथील गोकुळदास गुजराथी पतसंस्थेला दिलेल्या 2 लाख 13 हजार 8 शे चा धनादेश खात्यावर रक्कम अभावी वाटला नाही यामुळे पतसंस्थेने धनादेश अनादर प्रकरणी साक्री न्यायलयात दाखल केलेल्या न्यायालयाचा निकाल पतसंस्थे कडून लागल्याने कर्जदार चिंतामण धुळू बोरकर रा. गंगापूर ता. साक्री यांस 4 लाख रूपये दंड व 6 महिन्याची कारावास शिक्षा साक्री न्यायलयाने सुनावली.
निजामपूर येथील गोकुळदास गुजराथी संस्थेने गंगापूर ता.साक्री येथील चितामण धुळू बोरकर यांने कर्ज मागणी नुसार दि. 09 एप्रिल 2011 रोजी 3 लाख 50 हजार रूपयाचे कर्ज मंजूर केले कर्जा च्या परताव्या साठी चिंता मण बोरकर यांनी 3लाख 13 हजार 8 शे रुपयाचा धनादेश पंतसंस्थे ला दिला मात्र सदर धनादेश रक्कमे अभावी वाटला नाहि धनादेश अनादर झाल्याने पतसंस्थेने साक्री न्यायलयात दावा दाखल केला कलम 138 प्रमाणे सदर चा दावा न्यायलयात दाखल करण्यात आला होता. 2012 पासुन हा दावा न्यायलयात सुरू होता.या दाव्याचा निकाल 20/12/2023 रोजी साक्री च्या न्यायलयात दोन्ही बाजुच्या म्हणन्या नुसार लागला त्यात कर्जदार चिंतामण बोरकर यांस धनादेश अनादर प्रकरणी दोषी ठरवत न्यालयाने 4 लाख रूपये दंड व सहा महिन्यांची शिक्षा सुनावली न्यायदेवते वर आमचा सुरूवाती पासुन विश्वास होता व पंतसंस्थेला न्याय मिळेल या निकाला ने सहकार क्षेत्राला हि न्याय विषयी विश्वास झाल्या चे पंतसंस्थे चे संस्थापक पंकज शाह यांनी समाधान व्यक्त करताना सागितले. अँड. एम. आर. भामरे यांनी कामकाज पाहिले.