DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी पकडला. यात 20 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करीत चालक व मालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले.
शनिवारी भिवापूर पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास एमच 40 सीडी 8475 क्रमांकाचा टिप्पर निलज वरून उमरेडच्या दिशेने जाताना दिसला. जवराबोडी शिवारात टिप्पर थांबवून पाहणी केली असता त्यात ओव्हरलोड वाळू भरलेली आढळून आली. चालकाकडे वाळूची रॉयल्टी नसल्याने पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेत पोलीस स्टेशनला जमा केला. यात टिप्पर किंमत 20 लाख व 6 ब्रास वाळू किंमत 30 हजार असा एकूण 20 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. टिप्पर चालक आणी मालक यांच्या विरुद्ध कलम 379,109 भा.द.वी. सहकलम 48(7),48(8) महा. ज.म.स. सहकलम 4,21, खाणी आणि खनिजे अधी. 1957 सहकलम 3,4 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. 1984 अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवित चालकाला अटक केली.
वरील कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रमोद चौधरी, उपनिरीक्षक संदीप सडमेक, सहाय्यक फौजदार अशोक ठाकूर, रवी वानखेडे, चालक अविनाश सोरदे यांनी पार पाडली.