नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आळेफाटा पोलिसांची दमदार कारवाई, बसस्थानकांत चोरी करणारी टोळी केली जेरबंद

८ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त..

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- मनोहर गोरगल्ले

पुणे:- आळेफाटा येथील एसटी बस स्थानकातून प्रवाशांचे दागिने चोरणारी टोळी आळेफाटा पोलिसांनी गजाआड केली टोळीमध्ये ७ चोरट्यांसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या २ सोनारांचा समावेश आहे त्यांच्याकडून ७ तोळे सोने सोन्याचे दागिने व जीप असा एकूण आठ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली. रामेश्वर आंबादास जाधव (रा. शिरापूर जि. बीड), विकास शिवाजी गायकवाड (रा.दहीटणा जि.जालना), आकाश अशोक जाधव (रा.सलगरा जि.लातूर), दीपक ज्ञानेश्वर जाधव (रा.शिरपूर जि.बीड ), सागर संपतराव झेंडे (रा. बीड) जालिंदर वामन डोकडे (रा. शिरूर कासार जि. बीड )आरिफ रहमान शेख (रा.बीड), सोनार अण्णा दिगंबर ढेपे व आकाश बेंद्रे दोघे (रा.बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विजय औटी हे आळेफाटा एसटी स्थानकातून मुंबई येथे जाण्यासाठी एसटी बस मध्ये चढत होते यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन साखळी चोरून नेली. याबाबत फिर्याद आळेफाटा पोलीस ठाण्यात औटी यांनी दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण तसेच खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोनसाखळी चोरणारे चार चाकी वाहनातून येत आळेफाटा बस स्थानकात गर्दीत शिरून प्रवाशांचे दागिने चोरत असल्याचे समजले त्यानुसार त्या चार चाकी वाहनांचा क्रमांक प्राप्त करून चोरट्यांची नावे व पत्ता पोलिसांनी निष्पन्न केला. त्यानंतर पोलीस पथकाने बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी टोलनाक्यावर सापळा रचून चोरट्यांना जीपसह (एम.एच ४४ बी ७१३७)पकडले. त्यांनी आळेफाटा बस स्थानकात परिसरात एप्रिल २०२३ नंतर चार गुन्हे केल्याची कबुली दिली. तर या चोरट्यांनी चोरलेले दागिने विकत घेणाऱ्याअण्णा ढेपे व आकाश बेद्रे या सोनारांना ही अटक करण्यात आली. एकूण ७ तोळे सोन्याचे दागिने व जीप जप्त करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधरी, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, नरेंद्र गायकवाड, भीमा लोंढे, संजय शिंगाडे, संतोष दुपारगुडे अमित माळुंजे, नवीन आरगडे, हनुमंत ढोबळे, केशव कोरडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:29 pm, May 14, 2025
temperature icon 38°C
छितरे हुए बादल
Humidity 30 %
Wind 16 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 5:53 am
Sunset: 7:00 pm
Translate »
error: Content is protected !!