DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : माध्यमिक विद्यालय तामसवाडी ता. साक्री जि.धुळे या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खान्देश एज्युकेशन सोसायटी तामसवाडी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी निंबा साहेबराव साळुंखे व त्यांची सह-धर्मचाऱीनी सौ. जयश्री निंबा साळुंखे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला.त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तामसवाडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री बुवाजी पवार यांनी भूषविले. ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश एज्युकेशन सोसायटी तामसवाडी संस्थेचे चेअरमन व महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रकाशजी सोनवणे, डॉ. प्राध्यापिका सौ. रत्नमाला प्रकाश सोनवणे, होमी भाभा विज्ञान संस्था मुंबई, विधीतज्ञ कुंदन पवार, सहकार अधिकारी गिरीश महाले, तामसवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच शोभा अहिरराव, सदस्या सीमा खैरनार, सुनंदा सोनवणे, माया माळीच, महिला अध्यक्ष मीराबाई अहिरराव, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर अहिरराव, पंकज वाघ, गुलाब माळीच, नवनियुक्त पो.पा. महेंद्र अहिरराव, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन नंदलाल अहिरराव ग्रा.प. सदस्य शांताराम अहिरराव, उपसरपंच निंबाजी अहिरराव,माजी सरपंच सुपडू अहिरराव ,नागू अहिरराव तामसवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण अहिरराव कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी संस्था प्रमुख प्रा.श्री प्रकाश सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून शाळा ही आपल्या सर्वांची असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्वांगाने घडवण्यासाठी प्रयत्न केला जातो विद्यार्थी घडल्याने गावाचा विकास होत असतो असे त्यांनी नमूद केले .विधीतज्ञ कुंदन पवार यांनी आपले मनोगतातून शाळा ही विद्यार्थी विकासाचे केंद्र आहे त्याची जोपासना केली गेली पाहिजे .तर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री निंबा साळुंखे यांनी शाळा ओपनिंग पासून तर आत्तापर्यंतचा लेखाजोखा मांडला त्यात त्यांनी सांगितले की मी गेल्या 33 वर्षे या शाळेचा मुख्याध्यापक असताना संस्थाप्रमुखांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत शाळेच्या संवर्धनासाठी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वांगाने प्रयत्न केले, त्यामुळेच एका रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. त्यासाठी त्यांना सर्वच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी. अहिरराव यांनी केले तर सूत्रसंचालक व आभार एन.बी. खैरनार यांनी मानलेत. केले.अनुमोदन व सांस्कृतीक कार्यक्रमाची तयारी श्रीमती व्ही.ए. सोनवणे यांनी सर्वांच्या मदतीने करून घेतली. कवायतीचे सूत्रसंचालन के.एम. जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.आर. नांद्रे, वाय.यु. भामरे, जे.बी. मासुळे, एस. के. वाघमोडे, एन.बी. सोनवणे, डी.वाय. अहिरराव, के.डी. अहिरराव,एस.एस. सोनवणे यांनी प्रयत्न केले.