DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले
निजामपूर : साक्री तालुक्यातील जैताणे येथील रहिवासी तसेच सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ. राहुल पैठणकर यांना दि.27 जानेवारी 2024 रोजी, “सामाजिक चळवळीतून निर्माण झालेल्या जीवनशाळा : व्यष्टी अभ्यास” या पीएच. डी. विषयावरील मौखिक परीक्षा प्रा.डॉ. ज्योती बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी जाहीर केली आहे. त्यांना जगन्नाथ कडवादास महाविद्यालयातील प्राचार्य प्रा. सु.लो. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले असुन अँड पंकज वेन्दे, दिपक सावंत, डॉ.मनोज भागवत, योगेश सोनवणे, दिनेश सुर्यवंशी, भटु न्याहळदे पत्रकार रघुविर खारकर, हेमंत महाले आदि गावातील मित्र परिवार जेष्ठ श्रेष्ठानी अभिनंदन केले.