वनविभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे
नंदुरबार:- बामखेडा (ता.शहादा ) येथे गेल्या चार महिन्या पासून बिबट्याच्या वावर असून काल रात्रीच्या सुमारास सेवानिवृत्त वन अधिकारी व त्यांच्या मजु्रांचा पाचशे मीटर पर्यंत पाठलाग केला, दैव बलवत्तर म्हणून ते वाचले, परंतु शहादा वन विभाग मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
गेल्या तीन महिन्यापूर्वी सुद्धा सदर बिबट्याने पीक संरक्षण सोसायटी मालकी असलेल्या घोड्याच्या फडशा पाडल्या, त्यानंतर काही दिवसातच परत दुसऱ्या घोड्यावर वार केला परंतु तो थोडक्यात बचावला, या घटनेने सावधान होत पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन रमाकांत चौधरी व संचालक मंडळाने तहसीलदार व वन विभागाला अर्ज केला, पण या अर्जासंबंधी वन विभाग अनभिज्ञ आहेत असे भासवत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे, काल पुन्हा रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बामखेडा येथील सेवानिवृत्त वनाधिकारी एस आर चौधरी व त्यांचे मजूर हरभरा पेरा असलेल्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्या काही अंतरावरचं बिबट्या समोर आला, त्यांनी प्रसंगावधान राखत व अनुभवाने तिथून पळ ठोकला, बिबट्याने त्यांच्या पाठलाग केला परंतु तेवढ्यात दोन्ही जण गाडीत चढल्यामुळे व गाडीच्या स्पीकर च्या आवाज मोठा केल्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला त्यामुळे ते वाचले, स्वतः सेवानिवृत्त वन अधिकारी असल्यामुळे त्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांविषयी माहिती होती, म्हणून त्या अनुभवाने ते वाचले परंतु सामान्य शेतकरी व मजुरांना याबद्दल जनजागृती व माहिती नसल्याकारणाने ते कसे वन्य प्राणी हल्ल्या पासून वाचू शकतील? याबद्दल साशँकता आहे,कारण याविषयी वन विभागाचा अधिकाऱ्यांनी कधीच गावात व परिसरात भेट देऊन जनजागृती केली नाही बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा भीतीने मजूर शेतात काम करण्यास नकार देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची भीती सतावत आहे,सदर विभागाने जनजागृती करून उपाययोजना कराव्यात व अशा घटना रोखण्यात याव्यात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया:- एस आर चौधरी (सेवानिवृत्त वन अधिकारी)
गेल्या चार महिन्यापासून गावाचा शेत शिवारात बिबट्या चा संचार हा शेतकऱ्यांना सतत दिसतो आहे, या बद्दल स्थानिक प्रतिनिधी व जागृत नागरिकांनी फोन करून प्रत्यक्षात अर्ज देऊन वन विभागाला वेळोवेळी कळविले आहे, परंतु सदर कर्मचारी हे याबाबतीत गांभीर्याने घेत नाही, चार महिन्यांपूर्वी बिबट्याचा हल्यात एक घोडा मारला गेला, एक कसा बसा वाचला, काल रात्री मी शेतात असताना माझ्या समोर काही अंतरावर बिबट्या दिसला परंतु वन्य प्राण्यांविषयी असलेली मला माहिती व अनुभव यामुळे मी माझे व मजुराचे संरक्षण केले परंतु या ठिकाणी जर साधा मजूर किंवा शेतकरी राहिला तर त्याची काय गत होणार ? शहादा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाच्या अभाव असून ते जनजागृतीत कमी पडत आहे किंवा जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असे दिसते.आठ दिवसात बिबट्याच्या बंदोबस्त केला नाही तर वन विभागासमोर आंदोलन केले जाईल.
प्रतिक्रिया :- जय किसान विकास सोसायटी चेअरमन – रमाकांत मगन चौधरी
गेल्या अनेक दिवसापासून बामखेडा शेत शिवारात बिबट्याने दर्शन दिले आहे. यामुळे शेतकरी व मजूर वर्गात भितीचे वातावरण आहे.तसेच वन विभागाला स्थानिक पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात कळविले आहे.याची दखल घेत वनविभागाकाडून जनजागृती करणे अपेक्षित असताना वनविभागाने दुर्लक्ष न करता लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा एकदा मजूर किंवा शेतकरी वर्गाचा जीवाला धोका निर्माण होवू शकतो.