DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे – दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे होणा-या भारतातील राष्ट्रीय कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड झाली आहे. यात भारतभरातून विविध शाळा, महाविदयालयातील विदयार्थी गण उपस्थित राहणार असून त्यांना भारतातून विविध सायबर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यात अॅड. भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून भूमिका मांडणार आहे. सदरील राष्ट्रीय सायबर सेक्युरिटी कॉन्फरन्स, नाशिक चॅप्टरचे आयोजक स्वरदा कखनुरकर (व्हाईट बॅण्ड असोसिएटस्) यांनी आयोजित केली आहे. सदरील राष्ट्रीय कॉन्फरन्स येथे श्री. तपनकुमार झा, रिध्दी सोरल व दीपक राज राव,दिल्ली हे या सायबर तज्ञांचा देखील समावेश असणार आहे. सदरील एकदिवसीय राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये संपुर्ण भारतातून आलेल्या विदयार्थी, डॉक्टर, इंजिनिअर्स, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरीकांना अॅड. भंडारी हे मार्गदर्शन करणार आहे तसेच त्यांना सायबर सेक्युरिटी विषयी ज्ञान देणार आहे, म्हणून नागरीकांनी मोठया संख्येने या राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये उपस्थित राहून सायबर सुरक्षिततेसंबंधी जागरुक रहावे.