DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- काकडे सुहास कुमार
नांदेड:- महाराष्ट्र शासनाचा बंदी आदेश लागू असताना गुटखा माफिया खुलेआम पणे गुटख्याची वाहतूक व सर्रास विक्री करत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग दुर्लक्ष करत असल्याचे अनेक पोलिसी कार्यवाहीतून समोर आले आहे. नांदेड वरून लोहा मार्गे गुटखा व बनावट तंबाखू वाहनाद्वारे जात असल्याची गुप्त माहिती लोहा पोलिसांना मिळाल्यावरून केलेल्या कार्यवाहीत टाटा मॅजिक गाडी दोन आरोपी सह ५ लाख २५ हजार ५४० रुपयांचा तंबाखू व गुटखा जप्त केला. सदरील घटना दि. २८ रोजी रात्री साडे दहा वाजता घडली.
मागील अनेक दिवसांपासून लोहा शहर परिसरात अनधिकृत व शासनाचा बंदी आदेश लागू असताना लोहा शहरातील सायाळ रोड परिसरात गुटखा स्टॉक करून शहरातील गवळी गल्ली पाटील गल्ली भागात दुकानातून पान ठेले, लघु किराणा दुकानदार यांना गुटखा, सुंगांधित तंबाखू, जर्दा विक्री केले जात आहे. स्थानिक पोलिसांनी कांहीं भागातील पान ठेल्यावर कार्यवाही केली मात्र थांडवलेला गुटखा व्यवसाय पुन्हा तेजीत आला असल्याचे दिसून येत आहे. दि. २८ रोजी रात्री साडे दहा वाजता चे दरम्यान नांदेड येथून लोह्याकडे वाहनातून बनावट तंबाखू व गुटखा जात असल्याची गुप्त माहिती लोहा पोलिसांना मिळाल्यावरून पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांनी सपोनि साईप्रकश चन्ना यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक नांदेड रोडवरील पारडी तांड्या नजीक तर इतर दोन ठिकाणी अन्य पोलिस तैनात करून वाहनांची कसून तपासणी सुरू केली असता नांदेड रोड वर पारडी तांड्या जवळ टाटा मॅजिक क्र. एम एच ०४ एफ पी ०९१० या वाहनात ३५ बॅग बनावट सूर्य छाप जर्दा, विमल पान मसाला व सुगंधित जर्दा, आदत नावाचा गुटखा आदी अंदाजे ५ लाख २५ हजार ५४० रुपये किमतीचा बनावट तंबाखू व गुटखा आढळून आला. सर्व मुद्देमाल व वाहन चालक व अन्य एक असे दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये शेख समेर शेख आयुनोदीन (वय २१) व सय्यद अमेर सय्यद महमद अली (वय ३२) रा. नांदेड अशी आहेत. याप्रकरणी पोकॉ नारायण कदम यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात कोटपा अधिनियम सह इतर कलमअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चन्ना करत आहेत.
सदर कार्यवाहीत सपोनि चन्ना, पोकॉ नारायण कदम, निवृत्ती मुलमवाड, संजय मेकलवड, नामदेव ईजुळकंठे, वामन राठोड आदींनी परिश्रम घेतले.