DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव
उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असणाऱ्या एका छोट्याश्या वर्षी गावातून एक युवक शिक्षण व रोजगारासाठी स्थलांतर करतो.बघता बघता परिश्रमाने या व्यक्तीचे जीवनात परिश्रमाने कायापालट होते. तो व्यक्ती म्हणजे कामगार मोर्चा भा.ज.पा.पुणे जिल्हा पुणे उपाध्यक्ष किशोर अहिरे.
फक्त इयत्ता बारावीचे शिक्षण घेऊन वर्षी गावातील हा युवा पुढील शिक्षणासाठी धुळ्याला जातो.बेलफुल विकणे,पाव विकणे असे छोटे-मोठे उद्योग करून हा युवा त्याचे शिक्षण पूर्ण करतो.शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई येथे स्थायिक होऊन महिंद्रा कंपनी येथे अप्रेंटिसचे कार्य करतो.त्यानंतर टाटा मोटर्स पुणे येथे कार्य करत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतो परंतु वैयक्तिक कारणास्तव शिक्षण पूर्ण करू शकत नाही.आर्थिक परिस्थिती सदृढ करण्यासाठी व्यवसाय निवडतो व व्यवसायामध्ये स्वतःला इतके झोकून देतो की इतर कुठल्याही गोष्टींकडे लक्ष राहत नाही.बघता बघता हा व्यक्ती स्वतःचे एक वेगळच अस्तित्व निर्माण करतो.लोकांना रोजगारी मिळवून देणे,गरजूंचा समस्या सोडवणे असे छोटे मोठे समाजसेवेचे कार्य करू लागतो.
या युवाने सन 2019 मध्ये पुण्याजवळील चाकण येथे खानदेश महोत्सव घेतला या महोत्सवात जवळजवळ पंधरा हजार खान्देशी बांधवांना एकत्र केले व एक यशस्वी संयोजक म्हणून उपक्रम घडवून आणला.एम.आय.डी.सी.मध्ये अनेक लोकांच्या सेवा केल्या,अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले.आमदार बच्चू कडू साहेबांकडून प्रेरणा घेत लोकसेवा चालू ठेवली.राळेगण सिद्धीला प्रत्यक्ष भेट देऊन अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाने प्रेरणा मिळवली.अनाथांची आई स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्याकडून लोकसेवेचे मार्गदर्शन मिळवले व अशा अनेक मंडळीकडून सहकार्य व मार्गदर्शन घेत किशोर अहिरे यांचा आत्मविश्वास दृढ होत गेला.केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब,यशस्वी उद्योजक पोपट शेठ घनवट महाराष्ट्र व्यापारी आघाडी सचिव सचिन भाऊ वाघमारे सावली फाउंडेशन,बहुजन रयत परिषद व अर्चनाताई गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने *स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे युवा रत्न आदर्श समाज सुधारक* पुरस्कार *किशोर अहिरे* यांना जवळजवळ तीन हजार पर्यंत उपस्थित असलेल्या जनसमुदाया समोर सन्मान चिन्ह व सन्मानपत्र सहित देण्यात आला.
किशोर अहिरे,गुरव समाजाचे सेवक असून गुरव समाजाला त्यांच्यावर अभिमान आहे.किशोर अहिरे यांना जो सन्मान मिळाला त्यावर संपूर्ण गुरव समाज हा गर्वाचा अनुभव घेत आहे.कामगार मोर्चा भा.ज.पा.पुणे जिल्हा उपाध्यक्ष किशोर अहिरे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.