DPT NEWS NETWORK 🗞️✍️
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश राज. प्रकोस्ठ प्रदेश महामंत्री पदी धुळे जिंल्हातील राजकीय क्षेत्रात सामाजिकदृष्ट्या सक्रिय असलेले, निष्ठावंत कार्यकर्ते जितेंद्र सुभाष जैन-बंब यांची स्तुत्य निवड भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे नुकतीच करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमतीने भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये,भारतीय जनता पार्टी राज.प्रकोस्ठ चे प्रभारी मा.मंत्री राज.के पुरोहित, प्रदेशाध्यक्ष सुरेश के शहा, भाजपा प्रदेश सचिव अरुण मुंडे, मुख्य सहप्रवक्ते विश्वास पाठक, मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण, कार्यालय प्रमुख मुकुंद कुलकर्णी, कार्यालय सहसचिव भरत राऊत यांच्या उपस्थितीत जबाबदारीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी राज्यभरातून ज्येष्ठ पद्धिकारी, नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जितेंद्र जैन-बंब यांनी यापूर्वी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पूर्ण केले आहेत त्यात प्रामुख्याने भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोशल मीडिया जिल्हाप्रमुख,भाजपा धुळे ग्रामीण सरचिटणीस, धुळे जिल्हा “मन की बात” संयोजक, धुळे जिल्हा प्रसिद्धी व मीडिया प्रमुख, धुळे-मालेगाव लोकसभा प्रचार प्रसार प्रमुख, भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडी प्रदेश सह-संयोजक,भाजपा प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, अशा पक्षाच्या मंडल स्थरापासून ते प्रदेश स्थरापर्यंत विविध जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पूर्ण केल्या आहेत.
या निवडीबद्दल जितेंद्र जैन बंब यांचे
भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील,धुळे जिल्हाचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन,महायुती समन्वयक आ.प्रसाद लाड,नवनियुक्त राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपचडे,मा.मंत्री खा.डॉ.सुभाष भामरे,खा.डॉ.हिनाताई गावीत,मा.मंत्री आ.जयकुमार रावल ,मा.मंत्री आ.अमरीशभाई पटेल,आ.प्रशांत बंब,आ.काशिराम पावरा, धुळे जिल्हा प्रभारी स्मिताताई वाघ,धुळे जि.पं.अध्यक्षा धरती देवरे,भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, ज्येष्ठ नेते गजानन पाटील, सुभाष देवरे, मनोहर भदाणे,प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, जिल्हा सरचिटणीस किशोर शिंगवी, बाळासाहेब भदाणे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, प्रदेश औद्योगिक आघाडी उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील, धुळे ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष देवेंद्र पाटील, पश्चिम मंडल अध्यक्ष रितेश परदेशी,युवा नेते राम भदाणे, आशुतोष पाटील यांच्या समवेत आदींनी अभिनंदन केले.
यावेळी जितेंद्र जैन बंब यांनी सांगितले की पक्षाने जेव्हा केव्हा मला जी जबाबदारी दिली,मी ती इमान-इतबारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे व यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी मी यशस्वीरित्या नक्कीच पूर्ण करेल. भाजपा पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य सरकार चे कार्य शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविणे साठी मी सदैव प्रयत्नशील राहील.