DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव
नाशिक :- दि.१८/०२/२०२४ रविवार रोजी नाशिक येथील गुरव समाजातील “नाशिक जिल्हा शिवसेवा गुरव प्रतिष्ठान”दरवर्षी नवीन नवीन उपक्रम घेऊन कार्य करत असते प्रत्येक उपक्रम यशस्वी होत असतो.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमांमध्ये शिस्त खूप व्यवस्थितपणे पाळली जाते.
या प्रतिष्ठानने यावर्षी महिलांसाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.महिलांचा विशेष सन्मान केला. महिलांचा हळदी कुंकू,महिलांचा सन्मान,महिलांचे कलागुण,विद्यार्थी व विद्यार्थिनींचे कलागुणांचे कौशल्य असे अनेक विविध उपक्रम या कार्यक्रमात राबवण्यात आले.
विराट व विहान चंद्रकांत गुरव या दोन लहान बालगोपाल यांनी गणपती स्तोत्र बोलून कार्यक्रमाची सुरुवात केली.महिलांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे कलागुण खूप सुंदर पद्धतीने सादर केले.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ह.भ.प.कांचनताई जगताप यांचे कौटुंबिक व्यवस्था व जनमानसाचे जीवन या विषयावर अतिशय मोलाचे प्रबोधन झाले.
पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी विद्यार्थी व महिलांचा सन्मान करत सुंदर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमात कौशल्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकही दिले.महिलांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.धुळे येथील गुरव समाज संपर्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी यांनी सदर कार्यक्रमाची प्रशंसा करत ८ मार्च रोजी धुळे येथे होणाऱ्या श्री संत काशिबा महाराज गुरव यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळामध्ये नाशिककरांना उपस्थित होण्यासाठी निमंत्रण पत्रिका दिल्या.
गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्था धुळे येथील कोषाध्यक्ष सोनाली ताई गुरव यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत महिलांची समाजात प्रगती होत आहे तसेच महिला आता पुरुषाला खांद्याला खांदा लावून सामाजिक पातळीवर कार्य करत आहे असे कळवले.
शिवसेवा गुरव प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्ष निलुताई गुरव यांनी त्यांच्या महिला कार्यकारणीसह संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषा तयार केली.वैष्णवी ताई गुरव यांनी सत्यम शिवम सुंदरम गाणे सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली.हर्षदा गुरव,किर्ती गुरव,अपूर्वा सोनवणे यांनी गाण्यांमध्ये सहकार्य केले.आरती जाधव व सेजल सोनवणे व ईशांत राजकुवर यांनी नृत्य सादर केले. यशवनंदनी व प्रथमेश सोनवणे यांनी सुंदर जुगलबंदी करा तबलावादन सादर केले.
राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकारिणीवर असलेल्या सावंत मॅडम यांनी देखील सुंदर मनोगत व्यक्त करत समाजात अशाच प्रकारचे कार्यक्रम होणे आवश्यक आहे ज्याच्याने महिलांचा सन्मान व विद्यार्थ्यांचे कौशल्याचे गुण समाजा समोर येतील.
कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा शिवसेवा गुरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय गुरव तसेच त्यांचे संपूर्ण कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम करून या कार्यक्रमाला यशस्वी केला. नाशिक जिल्हा शिवसेवा गुरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत गुरव यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये जाहीर केले की यापुढे दरवर्षी संस्था २६ जानेवारी रोजी अशा प्रकारचे कार्यक्रम न चुकता न थकता राबवले जातील तसेच २६ हा दिवस गुरव समाज दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. या कार्यक्रमाचे संपूर्ण गुरव समाजात कौतुक केले जात आहे तसेच २६ जानेवारी हा दिवस ” गुरव समाज दिवस ” म्हणून साजरा करण्यात येईल याच्याने गुरव समाजात एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे व या जाहिरातीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.