DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- योगेश गवळे
नाशिक :- गंगापुर घोलीस स्टेशन हद्देत कार्तिकी आहिरे ह्या २३ फेब्रुवारी रोजी रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास दुध घेण्याकरिता दर्शील अपार्टमेंट, अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजीनगर, नाशिक येथून पायी जात असतांना सदर पार्किंगमध्ये लपुन बसलेला त्याच परिसरातील रेकॉर्डवरील संशयित मयुर गजानन वांद्रेकर याने पार्किंगमध्ये लाईट नसल्याचा फायदा घेत फिर्यादी कार्तिकी आहिरे या महिलेस चाकुचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या हातातील वियो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावुन घेवुन पळून गेला होता.
त्यानंतर फिर्यादी महिला हिने दिलेल्या तक्रारीवरुन गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिष्टरी दाखल करून घेतल्यानंतर पोलीसांनी तात्काळ आरोपीच्या शोध घेण्यासाठी यंत्रणा फिरवली असता फरार झालेल्या संशयित आरोपी हा खंबाळे जिल्हा नाशिक याठिकाणी लपुन बसलेला असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाचे अंमलदार सुजित जाधव यांना मिळाली असता त्यांनी ही माहिती गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना कळविली तेव्हा सोनवणे यांनी ही बाब वरिष्ठांना कळवुन त्यांची परवानगी घेतली आसता लगेचच गंगापुर पोलीस ठाण्याचे गुन्हेशोथ पथकाचे पोलिस हवालदार गिरीष महाले, तसेच सुजित जाधव, यांना सदर ठिकाणी रवाना केले त्यावेळी संशयित आरोपी मयुर वांद्रेकर वय २६ राहणार यशोधन डी रुम नंबर १ मराठी शाळेच्या बाजुला, शिवाजीनगर, नाशिक हा खंबाळे येथील पांझरेश्वर मंदीरात मिळुन आला.
त्यावेळी वांद्रेकर याला ताब्यात घेवुन गंगापुर पोलीस ठाण्यात आणले आसता त्याला नमुद गुन्हयाची कसून माहीती घेतल्यानंतर
त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हयात चोरी केलेला रुपये १० हजार रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेले शस्त्र त्याचेकडुन हस्तगत करण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संजय भिसे हे करित असुन वांद्रेकर याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ०१ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
सदर ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक. संजय भिसे, पोलिस हवालदार. गिरीष महाले, गणेश रहेरे, सोनु खाडे, सुजित जाधव, सर्व नेमणुक गंगापुर पोलीस स्टेशन अशांनी केली आहे.