नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळाने केला नाविण्यपूर्ण उपक्रम..

विद्यार्थ्यांचे कला गुण कौशल्याचा एक यशस्वी उपक्रम समाज भूषण पुरस्कार वितरण

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – संजय गुरव (शहादा)

नाशिक:- दि.११ फेब्रुवारी रविवार रोजी नाशिक येथील नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळाने मथुरा गार्डन, नाशिक येथे एक सुंदर व यशस्वी विद्यार्थी कला गुण कौशल्याचा उपक्रम घडवून आणला.


नाशिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गुरव समाज आहे. या समाजात दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात असतात. या वर्षी नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळ यांनी नाशिक येथील गुरव समाजातील जे विद्यार्थी कला व कौशल्य निपुण असतील अशा विद्यार्थ्यांचा एक सुंदर व यशस्वी कार्यक्रम केला. या कार्यक्रमात बहुतेक विद्यार्थ्यांनी स्वतःअंगी असलेली कला कार्यक्रमात दाखवली. काही विद्यार्थ्यांनी नृत्य केले, काही विद्यार्थ्यांनी गायन गायीले तर काही विद्यार्थ्यांनी संगीत कलाचे सुंदर कौशल्य त्या कार्यक्रमात दाखवले.
या कार्यक्रमात महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम व संगीत खुर्चीची स्पर्धा आयोजित करण्यात आली.संगीत खुर्ची स्पर्धा मध्ये विजेता झालेल्या महिलांना पैठणी पारितोषिक म्हणून देण्यात आली.स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.रुपाली राकेश गुरव व द्वितीय क्रमांक कु.यशोनंदनी कैलास गुरव या विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.महिलांच्या हळदी कुंकूचा कार्यक्रमात महिलांना पर्यावरण पूर्वक सुगंधी देणारे मोगराचे रोप देऊन सर्व महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या कार्यक्रमाला फार शोभा आलेली होती.विविध कौशल्यने पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आले. कार्यक्रमात मनोरंजन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समाज बांधवांनी मुक्त शब्द सुमनांनी स्वागत केले.
या कार्यक्रमात बाहेर गावाहून आलेल्या अतिथींच्या विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरटीओ अधिकारी तसेच गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सल्लागार मा. श्री.सुनीलजी बाबुराव गुरव हे होते.विविध क्षेत्रात यश संपादन करणारे समाज बांधव श्री.संजय उद्धव जाधव, अँड.सुरेंद्र राजाराम सोनवणे,श्री. रामचंद्र विश्वनाथ जाधव,श्री.संजय रंगनाथ जाधव,श्री. नंदकिशोर उद्धव जाधव, श्री. राजेंद्र आनंदा बाविस्कर,श्री.संजय महादू गुरव,श्री.देविदास नारायण गुरव,श्री.जितेंद्र दगडू गुरव,श्री.रघुनाथ सखाराम सोनवणे यांना समाज भूषण पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला तसेच गुरव समाज उन्नती संस्था महिला अध्यक्ष सौ. ज्योत्सना संजय गुरव,शिंदखेडा महिला मंडळ अध्यक्ष सौ.सुनंदा युवराज गुरव व जेष्ठ समाज सेवक श्री काशिनाथ निंबा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. निर्मलाताई सावंत,सोशल मीडिया अध्यक्ष नाशिक विभाग भाजपा सौ.उमाताई गुरव,ज्येष्ठ समाजसेवक श्री.अशोक खैरनार, श्री.तुळशीराम सोनवणे व श्री.वासुदेव गुरव, माजी अध्यक्ष गुरव समाज उन्नती संस्था मध्यवर्ती धुळे श्री.सुरेश केशव गुरव व श्री. बापूराव छबुलाल गुरव,माजी खजिनदार संजय रामकृष्ण गुरव,माजी सचिव चंद्रकांत गोकुळ गुरव,दाहीगाव गुरव समाज उपाध्यक्ष व गुरव ज्ञान गंगा प्रतिष्ठानचे सदस्य संतोष एकनाथ गुरव,समाजसेवक हेमंत मधुकर गुरव,अमळनेर गुरव समाज अध्यक्ष नितीन मोरेश्वर गुरव,शिक्षण समिती अध्यक्ष उमाकांत हिरालाल गुरव,मालेगाव गुरव समाज अध्यक्ष श्री.राहुल रमेश गुरव,गुरव ज्ञान गंगा प्रतिष्ठानचे सचिव संजय मधुकर गुरव, माजी अध्यक्ष दाहिगाव गुरव समाज नगीन बद्रीनाथ गुरव,सामाजिक कार्यकर्ते किरण प्रकाश शिंदे,अखिल भारतीय गुरव समाज अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोक पांडे व नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पवार, कामगार आघाडी मोर्चा भाजपा चाकण विभाग अध्यक्ष किशोर गुरव यां प्रमुख पाहुण्यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमात लाभली होती.
या कार्यक्रमाला विशेष योगदान देणारे संस्थापक अध्यक्ष पुंडलिक बाविस्कर, कायदेशीर सल्लागार अँड. सुरेंद्र सोनवणे, अध्यक्ष अँड. पवन गुरव, उपाध्यक्ष सुनीता गुरव, सचिव विजय बाविस्कर, सहसचिव विनायक भामरे, खजिनदार सुरेश सोनवणे, सह खजिनदार प्रकाश सुर्वे, सदस्य नंदकिशोर सोनवणे, रमेश महाले, सदाशिव गुरव, दिनेश बाविस्कर, धनराज गुरव, पद्माकर गुरव, राजेंद्र साळवेकर, भटू गुरव, प्रसिद्धी प्रमुख विकास बाविस्कर, चीफ ट्रस्टी राजेंद्र सोनवणे, सल्लागार बाळकृष्ण गुरव, मुकुंद सुर्वे, गजानन सूर्यवंशी, संदीप जाधव, किसन गुरव, काशिनाथ सोनवणे युवा कार्यकारणी मंडळातील अध्यक्ष हर्षल गुरव, उपाध्यक्ष मंगेश बाविस्कर, सचिव प्रवण महाले, सहसचिव ज्ञानेश्वर गुरव, यश गुरव, सदस्य सुनील खैरनार, पंकज महाले, दीपक खैरनार, योगेश राजकुवर, कौस्तुभ बाविस्कर, हेमंत जाधव, सचिन गुरव, कौशल गुरव, हर्षल गुरव, सुभाष महाले, वैशाख सोनवणे, सुशील सुर्वे, सांस्कृतिक मंडळातील, अध्यक्ष राकेश सोनवणे, किशोर सूर्यवंशी, सुधीर सोनवणे, यश अहिरे, मनोज गुरव, ललित गुरव आदी मान्यवरांनी या कार्यक्रमात विशेष योगदान दिले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन विजय बाविस्कर व राकेश सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन अँड. पवन गुरव यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!