यात्रेत कुण्यातरी मुलीसोबत फिरत होताची बायकोला दिली खबर; आरोपी ग्रामसेकाला राग आल्याने मेहुण्याला घरी बोलवून गळा दाबून केले ठार.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : शेंदवड (ता. साक्री) येथील चंदू गायकवाड (वय २७) याने ग्रामसेवक सुनील चौरे यात्रेत कोणत्यातरी मुलीसोबत फिरत असल्याबाबत चंदू गायकवाड च्या पत्नीस (मृताची चुलत बहीण) हीस फोन करून माहिती दिल्याचा राग आल्याने चंदूचा गळा दाबून ठार केल्याची घटना शेंदवड येथे घडली. संशयित आरोपी सुनील चौरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित आरोपी ग्रामसेवक सुनील धुडकू चौरे (वय ३६, मूळ गाव शेंदवड, ता. साक्री, जि. धुळे, ह. मु हरिओमनगर, पिंपळनेर, ता. साक्री) हा शेंदवड येथील यात्रेत एका मुलीसोबत फिरत होता. चंदूने याची माहिती सुनीलच्या पत्नीला फोनवरून दिली होती ,याचा राग आल्याने सुनील चौरे व पत्नी रेखा यांच्यात वाद होत असल्याने सुनील व रेखाने चंदूला शनिवारी (ता. २४) सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास शेंदवड येथे बोलवले. रविवारी (ता. २५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुनीलने चंदूला शिवीगाळ करून मारहाण केली व गळा दाबून ठार केले. भाऊ अशोक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून
पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळनेर पोलिस करीत आहे.