पुरातन विश्वकर्मा मंदिर सर्वांसाठी खुले करणार… आमदार मंजुळाताई गावित यांचे आश्वासन …..
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले
निजामपुर : अखंड सृष्टीची रचना करणारे प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त अखिल सुतार लोहार समाज निजामपूर जैताणे यांनी दि. 22 फेब्रुवारी रोजी श्री विश्वकर्मा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गावित ह्या होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जैताणे ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता अशोक मुजगे, निजामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली भूषण राणे, शिवसेना माळमाथा प्रमुख अशोक मंगा मुजगे ,साक्री तालुक्याचे युवा सेनेचे अध्यक्ष, अजयजी सोनवणे, साक्री नगरपालिकेचे नगरसेवक पंकजजी मराठे, निजामपूर ग्रामपालिका गटनेते हाजी ताहिर बेग मिर्झा, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागूल यांची उपस्थिती लाभली.
अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कावेरी दीपक मोरे यांनी केले व PM विश्वकर्मा योजना, बांधकाम कामगार योजना , तसेच विनाव्याज तीन लाखाचे कर्ज याबद्दल शासनाचे आभार देखील मानले.
आमदार मंजुळाताई गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अनेक गावांमध्ये मंदिरांची पुनर्बांधणी केली तसेच प्रभू विश्वकर्मा मंदिर खुले करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू तसेच सुतार लोहार समाज सभागृहासाठी तुम्ही फक्त जागा उपलब्ध करून द्या, बांधकामासाठी निधी प्राप्त करून देण्याचे काम माझे असे आश्वासन आमदार मंजुळाताई यांनी दिले. सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते .अशा या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निजामपूर जैताणे येथील अखिल सुतार लोहार समाजातील ज्येष्ठ समाज बांधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवा समाज बांधव यांनी परिश्रम घेतले समाजातील माता भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन .प्रकाश बच्छाव यांनी केले.