नाशिक एसीबीच्या कारवाईने धुळे जिल्ह्यात खळबळ…
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
शिरपूर : गौण खनिजाची वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली परत देण्याच्या मोबदल्यात 20 हजारांची लाच खाजगी इसंमा मार्फत मागणाऱ्या शिरपूर प्रांताधिकाऱ्यांच्या वाहन चालकाला नाशिक एसीबीने अटक केली.
शिरपूरातील 33 वर्षीय तक्रार यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली वाळू या गौणखनिजाची वाहतूक करताना गौणखनिज पथकाने पकडले होते. ते ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे खाजगी इसम बॉबी याने प्रांताधिकाऱ्यांशी माझी चांगली जवळीकता असून वाहन सोडण्यासाठी 20 हजार रुपये लागतील असे सांगून, 26 फेब्रुवारी रोजी खाजगी पंटर बॉबी सनेर याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली मात्र सापळ्याचा संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र पडताळणीत लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने खाजगी पंटर बॉबी सनेर व प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावरील चालक विसपुते यांना नाशिक एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक करीत धुळे एसीबीच्या ताब्यात दिले. शिरपूर शहर पोलीस स्टेशनला संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींच्या पथकाने केली ही कारवाई केली.