DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी करिष्मा चुटे यांची निवड करण्यात आली.
गुरुवारी (दि. 29) नागपूरच्या बजाज नगर येथील पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा ) गुजर यांनी करिष्मा चुटे यांच्या नियुक्तीची घोषणा करीत त्यांना नियुक्तीपत्र दिले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर व नागपूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या सुचनेवरून करिष्मा चुटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याची माहिती यावेळी बाबा गुजर यांनी दिली. शहर अध्यक्ष व पक्ष प्रवक्ता प्रशांत पवार, सावनेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बेबीताताई बांबल, हिंगणा तालुका अध्यक्ष मनीषा लकडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याबद्दल करिष्मा चुटे यांचे रा. काँ. पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. चुटे कन्हानच्या रहिवासी असून अजितदादा गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्या असल्याचे समजते.