DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सुनिल मैदीले
भिवापूर :- विदर्भाचे दैवत श्री संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन येथे विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रकट दिन उत्सव समिती तर्फे 2 मार्च ला सकाळी स्थानिक रामधन चौक परिसरातून महाराजांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. लेझीम पथक, डफ पथक, डफली पथक, बँड, भजन मंडळी आदींसह विविध झाक्या शोभायात्रेत समाविष्ठ करण्यात आल्या होत्या. ही शोभायात्रा नगरपंचायत, टीचर कॉलनी, तेलीपुरा, जुनी गुजरी, आझाद चौक, कलार ओळ चौक, टी हाऊस चौक मार्गे रामधन चौक येथे नेण्यात आली. या ठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात आला. आमदार राजू पारवे, माजी आमदार सुधीर पारवे यासह गणमान्य नागरिक व भाविक मंडळी मोठ्या संख्येनी यात्रेत सहभागी झाली होती. सायंकाळी रामधन चौक परिसरात आनंद मेळाव्याचे तर 3 मार्च या प्रकट दिनी सायंकाळी भाविकांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. स्थानिक आझाद चौक परिसरातही गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.