DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव
देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवालय हे प्राचीन, पुरातन काळातील मंदिर असून यादव काळात हेमाडपंथीय कलाकुसरीत साकारलेले देवस्थान आहे. बेळगाव सीमाभागातील तसेच महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवालयात लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.
पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री असून 7 मार्च रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत भाविक भक्तांचे अभिषेक केले जातात.8 मार्च रोजी महाशिवरात्री भर यात्रा असून या रात्री महारुद्र अभिषेक, यामपूजा केली जाते. तर 9 मार्च रोजी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते व त्यानंतर महाशिवरात्री उत्सवाची सांगता होते. ज्या भाविक भक्तांना अभिषेकसाठी नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी 7 मार्च पर्यंत आपली नावे श्री वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार उपसमितीकडे नोंदवावीत तसेच लाखो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार उपसमितीने केले आहे.