DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रुणमळी येथील ग्रामस्थांनी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी स्वतःच्या बँक खात्यात पंधरावा वित्त आयोग व विविध कामे दाखवून शासकीय निधीत अपराथपर केली असल्या बाबतची तक्रार केल्यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,धुळे यांनी ग्रामपंचायतीमधील विविध योजनेतील रकमा व मिळालेले निधी उत्पन्न यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करत संबंधित ग्रामसेवक यांना निलंबित केले व इतर आरोपींविरुद्ध विस्तार अधिकारी श्री.जे.पी.खाडे यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला हजर राहून रक्कम रुपये 75.88.782/. एवढा रकमेचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गुन्हातील आरोपी ग्रामसेवक चुनीलाल पंडित गायकवाड यास अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत असून त्यांनी न्यायालयात आरोपी हजर करत आरोपीच्या पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयापुढे प्रस्तुत केला.
त्या अनुषंगाने सहाय्यक सरकारी वकील अतुल डी जाधव यांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे शासनाची व प्रामाणिक करदात्यांची फसवणूक झालेली आहे गुन्ह्याचा सखोल तपास करणे बाकी आहे असा जोरदार व्यक्तीवाद केला न्यायालयाने सरकार पक्ष व आरोपी पक्ष दोघांना युक्ती क्तिवाद केल्यानंतर आरोपीस पाच दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली.