DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – रमजान मुलानी सांगली
सांगली :- जत शहरातील विजापूर गुहागर या महामार्गावरील सोलनकर चौकात तरुणावर तलवार हल्ला करून खून करण्यात आला. ही घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली मयत व्यक्तीचे नाव अविनाश बाळू कांबळे वय ३०वर्षे खूनाची बातमी जत शहर व परिसरात वाऱ्यासारखी पसरली हा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याची चर्चा जत शहरात सुरू आहे. मारेकरी हा मयत तरुणाचा जवळचा नातेवाईक असून तलवारीने डोक्यावर हल्ला करून खूना नंतर हल्लेखोर पसार झाला. खुनाच्या या घटनेमुळे जत शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. खुनाच्या घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सोलनकर चौकातील घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट दिली. खुनाचे गूढ अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना कौटुंबिक वादातूनच घटना घडली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.