खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते पुण्यात पुरस्कार वितरण…
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- भुवनेश दुसाने
पाचोरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारीता” पुरस्कार किशोर रायसाकडा यांना जाहीर झाला आहे. राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन २०२४ दि.१६ मार्च ला पिंपरी चिंचवड(पूणे) येथे संपन्न होत असून राज्याचे जेष्ट नेते खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण व रायसाकडा यांचा सत्कार संपन्न होणार आहे.
याच अधिवेशनात राज्य पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा युद्धवार्ता पुरस्कार,आरोग्य पत्रकारीता पुरस्कार, कृषी पत्रकारिता पुरस्कार, शोध पत्रकारीता पुरस्कार, अभिव्यक्ती पत्रकारीता पुरस्कार महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली, गुजरात येथील गुणवंत जेष्ट पत्रकारांना खा. शरद पवार यांचे हस्ते वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
किशोर रायसाकडा यांना याआधीही राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक या पुस्तकाने पुण्यात गौरविण्यात आले आहे .
“राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार ” घोषीत झाल्याबद्धल किशोर रायसाकडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.