DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
बिलोली: बिलोली शहरातील नवरत्न गल्लीतील शिवाजी चौकात मान्यवर प्रतिष्टीतांच्या उपस्थितीत नागरिकांनी सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम घेतले.
सदरील कार्यक्रमात कै. माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड, कै. सुषमा गंगावार,कै. रामजी नागोबा पटाईत, कै. मारूती कांबळे ( ढोलकी वादक), कै. बंडु पवार ( सहशिक्षक) कै. गोदावरी पोवाडे, कै. व्यंकोबा देवबा चुनडे आदी दिवंगताना दोन मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, प्रसिद्ध कलावंत दिलीप खंडेराय, सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबराव बागेलवाड, माजी नगरसेवक किशनराव पटाईत, धोंडीबा पवार, वैजनाथ मेघमाळे, गंगाधरराव शिंदे, गंगाराम भास्करे, सुभाष पाटील, गोविंद मुंढकर, नरसिंग मेघमाळे, अशोक पटाईत, नागनाथ यशवंते, राम शंखपाळे, गणेश खंडेराय, जळबा यशवंते, सुरेश तुडमे, विशाल खंडेराय, सतीष जोशी, मारोती मालुसरे, इलियास पटेल, फारूख शेख, प्रकाश पोवाडे, सुगत जाधव, हेमंत पटाईत, डॉ. मनोज शंखपाळे, देवन्ना तोंदरोड, इंद्रजित तुडमे, माधवराव शंखपाळे, प्रफुल्ल कल्याणकर, शिवाजी चुनडे, रवी पटाईत, सुनील मामडे, शंकर भालके, बाबामिया, राहुल शिंदे,निल खंडेराय आदीजनांसह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. या प्रसंगी दिवंगत देवाज्ञा झालेल्यांच्या जीवन कार्यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकले होते.