DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- साईनाथ खंडेराय
बिलोली: हिंदु धर्मियांचा होळी आणि मुस्लिम धर्मीयांचा रमजान ईद च्या मुहूर्तावर बिलोली शहरातील पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे.
सदरील बैठकीत बिलोली शहरांसह ग्रामीण परिक्षेत्रातील मुस्लिम धर्मीय आणि हिंदु धर्मीय बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. याशिवाय विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे व दिलीप मुंडे गजानन अनमूलवाड यांनी सोशल मीडिया वरील जातीय तेढ निर्माण करण्याऱ्या प्रवृत्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.