⚡ प्रशासनाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष ?
⚡चौकशी करून कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
बिलोली : तालुक्यात गेल्या एक ते दोन वर्षापासून महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंद्याना ऊत आला असून बिलोलीचे तहसील प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील उपविभागीय व तहसिल कार्यालय या दोन्हीही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या मुकसंमतीने दिवसेंदिवस मुरूम, रेती, माती व वीट धंद्याच्या अवैध व्यवसाय जोमात चालला असून प्रशासकीय यंत्रणा कोणतेच ऍक्शन घेताना दिसत नाही, विशेष म्हणजे सध्या तालुक्यात वीट भट्या चालकांचा मोठया प्रमाणात मनमनी पणा चालू असून बहुतांश वीट भटी चालकांनी कोणताही परवाना न काढता विट भट्या जागोजागी थाटले असल्याचे दिसून येत आहे. शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून असल्याचे दिसून येत आहे. परिणामी तालुक्यातील अर्जापूर, कुंडलवाडी, हज्जापूर चौरस्ता, पिपंळगाव, चिरली, टाकळी, कोळगाव, गुजरी यांसह अनेक गावात विट भट्या थाटल्या असून मोठया प्रमाणात अवैध काळ्या मातीची साठवणूक करून सदर विटा बनविल्या जात आहेत, त्यामुळे प्रशासनाने बिलोली तालुक्यातील सर्व विट भट्या चालकांची चौकशी करून अनधिकृत विटभटी चालकांवर कारवाई करून तेथील सर्व सामान जप्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक यादवराव लोकडे यांनी बिलोलीचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.