DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) येथील अरुण उखाजी साळुंके(माजी ग्रामसुधार मंडळ सचिव) यांचे चिरंजीव व डॉ. सचिन साळुंखे यांचे लहान बंधू डॉ. केतन साळुंखे यांनी स्थापत्य अभियांत्रिकीच्या सर्व अंगांनी प्रथितयश प्राप्त करून सुखद धक्का दिला. यापूर्वीचा त्यांचा शैक्षणिक प्रवास आपल्या शेवाळीच्या संस्कारभूमीतून झाला. लहानणापासूनच ते शिक्षणात अग्रेसर होते. शेवाळीतील जि.प.शाळेतून पहिली ते चौथीपर्यंत धडे गिरवत पुढे मालेगाव येथील के.बी. एच.माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतले.
जयहिंद महाविद्यालयात बारावी, एस.एस.वी.पी. एस.धुळे येथे बी.ई. सिव्हिल व वि.जे.टी.आय, महाविद्यालय ,मुंबई येथे एम.टेक. सिव्हिल पर्यावरण अभियांत्रिकी (इंव्हीरांमेंटल – इंजिनिअरिंग) केले. केतन साळुंकेनी एक कृतिशीलतेने पुढे नेला. ‘पाणलोटच्या प्राधान्यक्रमासाठी पांझरा नदी खोऱ्याचे परिमाणामात्मक आणि गुणात्मक विश्लेषण’ या विषयातून त्यांना नुकतीच *डॉक्टरेट* जाहीर झाली. यात त्यांना वी.जे.टी.आय. मुंबईचे विभागप्रमुख प्रा.डॉ. अभय वायाळ यांनी मार्गदर्शन केले. शेवाळी गावासाठी ही बाब लक्षवेधी आहे.त्यांच्या या यशाचे शेवाळीसह तालुक्यातील सर्व राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिकांनकडून अभिनंदनाचा वर्षाव करीत कौतुक केले जात आहे.