DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले
निजामपूर : निजामपूर जैताणे पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निजामपूर जैताणे या दोन्ही गावातील प्रमुख मार्गांसह बाजारपेठ भागातून पथसंचलन केले. निजामपूर जैताणे पोलीस ठाणे येथून जवानांसह पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी पथकांनी पथ संचलनाला सुरुवात केली.पोलीस ठाण्या पासून खुडाणे चौफुलीवरून जैताणे ग्रामपालिका चौक, शिवाजी रोड, फरशी, भाजीपाला बाजार, गोरोबा कुंभार चौक मार्गे कुंभारवाडा, शंकरद्वार मंगल कार्यालय, निजामपूर बाजारपेठमार्गे प्रमुख मार्गावरून बस स्थानक परिसर या मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, साक्री ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर जैताणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीसजे. एन. सिंग, पोलीस उपनिरीक्षक एस. के. पांडे, बीएसएफचे अधिकारी, कर्मचारी पोलिसांसह होमगार्ड सहभागी झाले उपस्थित होते.सद्या लोकसभा निवडणुकी आचारसंहिता लागु झाली असुन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे असा संदेश या पथसंचलना मधुन देण्यात आला.