DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- भुवनेश दुसाने (पाचोरा)
पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने काम करत असतांना एका खासगी पंटरला लाच घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील महिन्यात रंगेहाथ पकडले होते. तसेच मागील महिन्यापासून आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बऱ्याचशा कारवाईत खाजगी परंपरांना पकडले असून सद्यस्थितीत खाजगी पंटर दोशी दिसत असले तरी या खाजगी पंटरच्या डोक्यावर कुऱ्हाड बुद्रुक ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी किंवा सत्ताधारी सरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य यापैकी कुणाचातरी छुपा आशिर्वाद असल्याशिवाय हा खाजगी पंटर पैशांची देवाणघेवाण करुच शकत नाही अशी शंका सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले असून या घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यात सामील असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात असून पकडा गया वो चोर है बाकी सब शिरजोर है अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे कुऱ्हाड बुद्रुक येथील खासगी पंटर जरी आज पकडला गेला असला तरी आजही पाचोरा तालुक्यात तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात तसेच विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत झिरो वायरमनच्या भुमिकेत तसेच पाचोरा महसूल विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभागाच्या कार्यालयात कार्यालयासमोर किंवा आसपास आजही खाजगी पंटरांचे जाळे सक्रीय झाले असून यांच्यामार्फत आर्थिक देवाणघेवाण करुन कामे करुन घेतली जात आहेत. व खाजगी परंपरांच्या मार्फत केलेली कामे तडकाफडकी होत असल्याने गरजू लाभार्थी मजबुरीने यांच्या जाळ्यात अडकले जात आहेत.
याचेच जीवंत उदाहरण म्हणजे पैशांची देवाणघेवाण करतांना ज्या खाजगी पंटरला रंगेहाथ पकडले गेले आहे ती व्यक्ती कुऱ्हाड बुद्रुक येथील रहिवासी असून त्याचा ग्रामपंचायतीच्या कामकाजाशी काहीही संबंध नसतांना या व्यक्तीचा मागील तीन वर्षांपासून सतत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामात सक्रिय सहभाग दिसून येत होता. संबंधित व्यक्ती ही ग्रामपंचायतीचे दप्तर हातात घेऊन गावभर हिंडून शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्या राबवून घेण्यासाठी योग्य लाभार्थी शोधुन त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करुन कामे करुन देत होता असे खात्रीलायक वृत्त आहे.
जर का संबंधित खाजगी व्यक्ती ही ग्रामपंचायतीच्या कुठल्याही कामावर नियुक्त नसतांना ग्रामपंचायतीचे महत्वाचे दप्तर घेऊन गावभर हिंडून ग्रामपंचायतीच्या पडिक व बखळ जागेवर भोगवटे लाऊन देणे, घरकुल योजना, कृषी विभागाच्या विविध योजना संजय गांधी निराधार योजना, दिव्यांच्या विविध योजना व सवलती वैयक्तिक शौचालय व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थ्यांना भेटून तुम्हाला योजना मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करुन दप्तरात हेराफेरी करुन लाभ मिळवून देत होता व अशातच एका सुज्ञ नागरिकाकडे पैशांची मागणी केली असता त्याने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करुन संबंधित पंटरचा भांडाफोड केला आहे.
आजच्या परिस्थितीत हा खाजगी पंटर जरी दोशी दिसत असला तरी या खाजगी पंटरच्या हातात ग्रामपंचायतीचे महत्वाचे दप्तर देऊन ही कामे करुन घेण्यासाठी त्याला ग्रामसेवक किंवा सत्ताधारी सरपंच व सदस्यांनी सांगितले होते की काय हा महत्त्वाचा मुद्दा तपासणे गरजेचे आहे. कारण कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामसेवक हे जबाबदार घटक असतांनाही या खाजगी पंटर कडे महत्वाचे दप्तर आलेच कुठून व याला इतके अधिकार दिलेच कुणी असा प्रश्न उपस्थित केला जात असून या आर्थिक देवाणघेवाणीत खाजगी पंटरचा वापर करुन जबाबदार असलेले ग्रामसेवक व इतर कुणी आपला हेतू साध्य करुन घेत होते की काय अशी शंका जनमानसात निर्माण झाली आहे.
म्हणून कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायत कारभाराबाबत ढवळाढवळ करुन पैशांची मागणी केल्यामुळे जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून ज्याला आरोपी केले आहे त्याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित खाजगी पंटर, ग्रामसेवक यांचा भ्रमणध्वनीचा तपशील तपासण्यात येऊन यात कुणीही दोशी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात असून असे न झाल्यास (पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है) असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.