DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने
पाचोरा:- पाचोरा शहरातुन साडेतीन हजाराच्या गांजासह तरुणास ताब्यात घेतल्याची कारवाई पाचोरा पोलिसांनी केली आहे. जळगांव चौफुलीवर नाकाबंदी करत असलेल्या पोलिस पथकाने सदरची कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, जळगांव चौफुलीवर नाकाबंदी करत असलेले पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना एक तरुण हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या जात असतांना दिसला. पोऊनि धरमसिंग सुंदरडे यांनी तरुणाची विचारपूस करत पिशवीची झडती घेतली असता पिशवीत हिरव्या रंगाचा चिकट पदार्थ आढळुन आला. त्याचा वास घेतला असता गांजा सदृश भांग असल्याचे निष्पन्न झाले. तरुणास त्याचे नाव विचारले असता साई ज्ञानेश्वर चित्ते (वय – १९) असे सांगितले. त्यानंतर पोऊनि धरमसिंग सुंदरडे यांनी पोलिस स्टेशनमधुन पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पो. काॅ. योगेश सुरेश पाटील, व महिला पोलिस कॉन्स्टेबल शारदा भावसार यांना वजन काटा घेऊन पाचारण केले. हस्तगत करण्यात आलेल्या गांजा सदृश भांग चे वजन केले असता ३ हजार ४०० रुपये किंमतीचे गांजा सदृश भांग व साई चित्ते याचेजवळुन ९१० रुपये रोख हस्तगत करण्यात आले. साई चित्ते याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.