DPT NEWS NETWORK 🗞️✍️
शहादा :- लोणखेडा -येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कूल साठी वृक्षारोपण करा असे आव्हान वनश्री हैदरअली नुरानी यांनी सानेगुरुजी मित्र मंडळतर्फे शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले त्या प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी हरियाअली ट्रस्टचे अध्यक्ष वनश्री हैदरअली नुरानी होते तर प्रमुख पाहुणे साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी सचिव गुलाबराव पवार मुख्याध्यापक छगन बाबुराव रामोळे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम साने गुरुजीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर माणक चौधरी म्हणाले की तापमान वाढत आहे म्हणूनच प्रत्येक जन गाडी लावण्यासाठी सावली शोधत आहे सावलीसाठी शाळेचा आवारात, रस्त्याचा कडेला मोकळ्या जागेत वृक्षरोपन आवश्यक आहे असे सांगीतले.
या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थी रोहित लक्ष्मण ईशी, खुशबू हिरालाल सोळंकी, सृष्टी संतोष लोहार, भाविका योगेश्वर वाल्हे, कल्याणी सुनील महाले, भौतिक ज्ञानेश्वर जाधव, मनीष भगवान मोरे भाग्यश्री जितेंद्र तावडे, अंशप्रताप अजयकुमार वर्मा रिद्धी नरेश पावरा यांच्या सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी विद्यार्थ्यांनी वृक्ष प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छगन रामोळे यांनी केले तर सूत्रसंचालन वर्षा भोई यांनी व आभार गुलाबराव पवार यांनी मानले
यशस्वीतेसाठी गजानन वाघ, वैशाली कोळी, वासंती पावरा, चंदना भंडारी, माधुरी कांगणे यांनी परिश्रम घेतले.