DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अशोक पाटील
धुळे :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात बालविवाह होणार आसल्याची तक्रारी अर्ज बालकल्याण समितीस प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा महिला ब बालविकास आधिकारी गिरीष जाधव व जिल्हा बालसंरक्षण अधिकरी सतिश चव्हाण व नरडाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बेटावद ता. शिंदखेडा गावात बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे.
बेटावद ता. शिंदखेडा येथे दि 26 एप्रिल 2024 रोजी बालविवाह होणार आहे, असा बालकल्याण समितीला अज्ञात नावाने तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार बालकल्याण समितीने नरडाणा पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार केला असता त्या बालिकेच्या वयाचे पुरावे मिळवुन आणि प्रशासनाशी समन्वय साधत दि 26 एप्रिल 2024 रोजी हा विवाह थांबविण्यात आला त्याच बरोबर बालिका ब बालिकाचे आई-बडील व नातेवाईक यांना बाल विवाह प्रतीबंधक अधिनियम 2006 विषयी माहीती देवुन बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाईस आपण जबाबदार रहाल यांची जाणीव करुन देण्यात आली. तसेच बालिकेच्या कुटुंबियांना बाल कल्याण समिती येथे उपस्थित करण्यात आले या कारवाई वेळी नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक रामनाथ दिवे, सहा.पोलीस उपनिरीक्षक जी. डी. पावरा, सहा.पोलीस उपनिरीक्षक ए. आर. चव्हाण, हवालदार राकेश शिरसाठ, सुनिल पगारे, विजय माळी तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तृप्ती पाटील, चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर, केस वर्कर आदित्य साळुंखे, बेटावद गावाचे ग्रासेबक प्रमोद खलाणे हे उपस्थित होते.