DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपुर : भिवापूर शहरातून एक व्यक्ती सर्रास दारूची ग्रामीण भागात वाहतूक करतो आणि शहरातील काही मोजक्या अवैध विक्रेत्यांना दारू पुरवतो. वृत्तपत्रात बातम्या झळकल्यावर दिखाव्यासाठी पोलिस दहा, वीस दारूच्या निपा पकडण्याची कारवाई करतात. पण टू व्हीलर ने शहरातून दिवसा ढवळ्या दारूच्या पेट्या नेणाऱ्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. दारू प्रमाणेच सट्टा पट्टी व्यवसायाविरुद्ध सुद्धा थातूर मातुर कारवाई करण्यात येते. कारगाव मध्ये अवैध दारू विक्री जोरात सुरु आहे. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर वळण घेण्याच्या मार्गांवर आहे. शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण दारूच्या आहारी गेले असून परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गावातील शांतता पुनरस्थापित करण्यासाठी सुरु असलेले दारू अड्डे ताबडतोब बंद करण्याची मागणी कारगाव येथील महिलांनी काहि दिवस पहिले पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन केली होती. तरीपण गावात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री चे अड्डे सुरु आहेत.ज्या मार्गांवर अड्डे आहेत त्या मार्गांवर नेहमीच दारू ढोसणाऱ्याची मोठी गर्दी असते.मार्गाने येजा करणाऱ्या महिला,मुली यांना प्रचंड त्रास सोसावा लागतो.कारगाव व्यतिरिक्त लगतचे गावातील दारुडे दारू साठी येत असल्याने सकाळी व सायंकाळ च्या सुमारास दारू अद्द्यावर मोठी गर्दी उसळते.सामान्य गावकर्यांनां या मार्गाने येजा करणे कठीण होते. भांडणे, वादविवाद,मारपीट आदी प्रकार नित्याचे होऊन बसले आहे.या सर्व बाबीवर निर्बंध लावण्यासाठी गावातील दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे.