DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
नागपूर :- भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातून येणारी चोरीची वाळू भिसी मार्गे उमरेड, नागपूर, बुटेबोरी व हिंगणघाट येथे नेली जात असून या अवैध वाहतुकीला भिसी पोलिसांचे अभय असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यासाठी ट्रक मालकांकडून महिन्याला एन्ट्री वसुल केली जाते.
भिवापूर मार्गावर वाळूच्या चोरट्या वाहतूकिविरुद्ध पोलिसांकडून लागोपाठ कारवाई केली जात आहे. त्यामुळे ट्रक चालकांनी त्यांचा मोर्चा भिसी (जी. चंद्रपूर) मार्गावर वळवीला आहे. दररोज जवळपास पन्नास ते साठ ट्रक या मार्गावर वाळू भरून धावतात. ही वाळू मांगरूळ मार्गे उमरेड, नागपूर, बुटेबोरी येथे तर नांद, सिर्सी, गिरड मार्गे हिंगणघाट व वर्धा येथे नेली जाते. मागील काही महिन्यांपासून भिसी मार्गावर वाळू वाहतुकीला चांगलेच उधाण आले आहे. 24 तास या मार्गावरून वरून वाळूचे ट्रक धावतांना दिसतात. दिवसाच्या तुलनेत रात्रीला ट्रकची संख्या अधिक असते. रस्त्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस वाहन अधून मधून फिरतांना दिसते. मात्र वाळूचे ट्रक निघण्याच्या वेळेस हे वाहन ठाण्यात उभे केले जाते अशिही माहिती आहे.
—-> एन्ट्री वसुलीसाठी तीन पंटर
ट्रक मालकांकडून महिन्याला एन्ट्री घेतली जाते. पठाण, खोब्रागडे व अन्य एक, असे तीघे पंटर एन्ट्री वसुलीचे काम करतात. वसुल केलेल्या रकमेमधून पंटर मंडळी आपले कमिशन काढून घेतात व उरलेली रक्कम साहेबांकडे पोहचता करतात अशी माहिती आहे. ट्रकची संख्या कमी दाखवून काही पंटर अधिक रकम आत करीत असल्याचे समजते. साहेबांच्या वाहनाचा चालक सुद्धा वसुलीत सहभागी असतो असे सांगण्यात येते.
—-> एटीएम द्वारेही होते वसुली
अधून मधून एन्ट्री बंदचा फतवा काढला जातो. अशा वेळी प्रती ट्रक पाचशे रुपये घेऊन वाहने सोडली जातात. त्याला वाळू तस्करांच्या भाषेत ‘ एटीएम ‘ संबोधले जाते. एटीएम वसुलीचे कामही वरील पंटर बघतात.