DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
अकोला : मुर्तिजापूर शहरामध्ये चोरांनी खूप धुमाकूळ घातला आहे. पोलिस यंत्रणा ठप्प असल्याने ही चोरी करण्याची पाचवी घटना आहे.असे नागरिकांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे, या आधी बस आगार मध्ये एका महिलेचे सोनसाखळी खेचून चोरांनी पोबारा केला होता. देवरण येथील जागृत देवस्थान मारुती हनुमान मंदीरातून चांदीचे मुकूट चोरांनी लंपास केले होते. गुप्ता वाईन शॉप मधून ही चोरांनी रोखरक्कम चोरून नेले होते . आता शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या ठाकुर बोअरवेलचे दुकान रात्रीच्या वेळेला फोडून रोखरक्कम पळवून नेल्याची घटना घडली आहे.याचा पडसाद व भितीचे वातावरण व्यावसायिक लोकांवर होताना दिसत आहे. एवढ्या लागोपाठ चोऱ्या होत असल्यावर ही मुर्तिजापूर पोलिस यंत्रणा सक्रिय नसल्याने. अकोला जिल्ह्याचे अधिक्षक बच्चन सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन निरक्षण केले. व शहरात झालेल्या घटनेचा लवकरच छडा लावून आरोपी गजाआड करण्यात येईल आणि नागरिकांना व व्यवसायिकांना घाबरण्याची गरज नसून रात्रीच्या वेळी अधिक पोलिसांची पेट्रोलिंग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.