DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
अकोला:- कारंजा मुर्तिजापूर या रोडचे काम चार पदरी होत असून रोड उखाडण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. ज्या बाजूला रोड उखाडण्यात आला आहे,त्याबाजूला तोल जाऊन आतापर्यंत चार वाहनांची या मार्गाने चार वेळा पलटी झालेले आढळून आहे. ज्या बाजूला ट्रक पलटी झाली आहेत त्या बाजूला काम सुरू आहे याचे फलक कोठेच दिसून येत नाही आहे. त्यामुळे अंदाज चुकून वाहने पलटी होत असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आठवड्यात कोळसाचा ट्रक ,धान्य वाहतूक ट्रक,दोन कंटेनर असा वाहनांची पलटी झाली आहे.
त्या बरोबरच या रोडचे काम सुरू असताना वाहनांमुळे अती प्रमाणात धुळ उडत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेला वाहकांना समोरील वाहन दिसून येत नाही, त्यामुळे दुर्घटनाचे प्रमाण वाढणारच यात शंका नाही.
अती धुरामुळे नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात येत आहे , यावर उपाय योजना करण्यासाठी रोड बांधकाम विभागाने लक्ष देवून चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे,रोडवर वेळोवेळी टंकरनी पाणी टाकणे, वेळोवेळी रोलर फिरवणे,फलक लावणे, अशा पध्दतीने काम करण्याची सक्त गरज आहे.
नाही तर आजचे इंजिनिअर तसेच ठेकेदार पैसे वाचविण्याच्या भानगडीत नागरिकांच्या जिवाशी खेळल्या जाते, रोडचे काम ही कमी दर्जाचे केले जाते यावर कोणीच आवाज उचलताना दिसून येत नाही, त्यामुळे प्रशासनानेच गांभीर्याने लक्ष देऊन सरकारी कामाचा दर्जा वाढवून देशाचे हित जोपासले पाहिजे.