DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- किरण अडागळे
सातारा:- सातारा शहर पोलीस यांनी तडीपार गुंडाला पकडून त्याच्याकडे असलेला दोन किलो एकशे ऐंशी ग्रॅम गांजा जप्त केला. यांची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये आहे. नितीन पांडुरंग सोडमिसे, वय३१, चुना गल्ली, रविवार पेठ सातारा असे संशयिताचे नांव आहे. तो गांजा विक्री करणार असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , सातारा शहरात वीस मे रोजी गांजा विक्री करणेसाठी तडीपार गुंड येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना समजली. त्या नुसार सदरबझार परिसरात संशयित एका बंद कंपनीच्या गोडावुन परिसरात आला. त्याच्या हातात पांढरे रंगाचे पिशवी मध्ये काही संशयास्पद दिसले म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तडीपार असताना कसे आला असे प्रश्न विचारले असता तो निरूत्तर झाला. पोलिसांना पिशवी मध्ये गांजा आढळून आला व तो विक्री करणार असल्याचे सांगितले. सातारा शहरात गेल्या काही वर्षांत गांजा विक्री प्रमाण वाढले आहे. एरव्ही गांजा ओढणारे यांच्या वर कारवाई होत नाही. मात्र पोलिसांनी केलेली ही कारवाई मोठा असल्याचे मानले जात आहे. सातारा येथील गांजा विक्री तस्करीचा पर्दाफाश होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डीवाय एस.पी. राजीव नवले, पोनी राजेंद्र म्हस्के, पोनी निलेश तांबे (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली डिबीचे सपोनि अविनाश माने, फौजदार सुधीर मोरे, पोलिस श्रीनिवास देशमुख, सुजित भोसले, राहुल घाडगे, निलेश जाधव, पंकज मोहिते, संतोष शेलार, वगैरे यांनी कारवाई मध्ये भाग घेतला.