DPT NEWS NETWORK🗞️✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड:- तालुक्यातील ग्रामीण भागातून बेसुमार वृक्षतोड होत असून पर्यावरणास धोका निर्माण झाला असून याकडे वनीकरण विभाग दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यातील पर्यावरणास पूरक असे वृक्ष नाहीसे होण्याच्या मार्गावर असून याकडे वन विभागास काहीच गांभीर्य नाही तालुक्यातील आरा मशीन ह्या रात्री व दिवस चालू असून या बाबीकडे वन विभागातील कर्मचारी अर्थपूर्ण काना डोळा करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
तालुक्यातील वृक्षवल्लीचे रक्षण करण्यासाठी शासनाचा वन विभाग असून या तालुक्यासाठी आहे की नाही सध्या चिंच आंबा बोर लिंबू बाभूळ सागवान यासारख्या मौल्यवान वृक्षतोड राजरोसपणे कटाई करण्यासाठी शहरातील मशीनवर आणल्या जात आहेत.
याकडे अर्थपूर्ण काना डोळा करणाऱ्या वन विभागातील कार्यवाही करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.