DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड :- नांदेड येथील प्रादेशिक परिवहन विभागास नवीन 5 इंटरसेप्टर स्कॉर्पिओ वाहन देण्यात आले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने या नवीन इंटरसेप्टर स्कार्पिओ वाहनामधून रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी दि 21मे मंगळवारी ध्वनिफीत लावून नायगाव नरसी बिलोली शहरातील मुख्य चौकातून नरसी डिचपल्ली रोड वरती रॅली काढण्यात आली होती या 7 वाहनांमध्ये 14 अधिकारी 7 कर्मचारी उपस्थित होते.
या अगोदर दोन इंटरसेप्टर स्कॉर्पिओ वाहने होती आता एकूण 7 झाली आहेत या वाहनांमध्ये सीट बेल्ट न लावता स्पीडने गाडी चालवताना आढळून आल्यास हेल्मेट न घालणाऱ्या मोटरसायकल स्वारावर, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकावर, काळी फिल्म बसविलेल्या वाहनावर कारवाई करण्यासाठी या वाहनांमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. आलेल्या नवीन 5 इंटरसेप्टर वाहनांमध्ये आज दिनांक 21 मे रोजी नायगाव नरसी बिलोली शहर तसेच नरसी डिचपली रोड मुख्य चौकात रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन चालविताना रस्ता वाहतुकीच्या नियमाचे व मोटर वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे आपले वाहन सुस्थितीत ठेवावे तसेच वाहनाचे कागदपत्रे जसे विमा कागद प्रमाणपत्रे पीयूसी योग्यता प्रमाणपत्र कर पावती इत्यादी अद्यावत ठेवावीत नांदेड जिल्ह्यात दळणवळणाचा विचार करता रस्त्याद्वारे होणाऱ्या वाहतुकीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे नांदेड जिल्ह्यात दरवर्षी किमान 350 ते 400 नागरिक रस्ते अपघातात मृत्यू पडतात त्यामध्ये प्रामुख्याने वाहतूक नियमाचे पालन न करणे, हेल्मेट वापर न करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, रस्त्यावरच्या लाईनचे शिस्त न पाळणे, वेगमर्यादा उल्लंघन करण्याआधी कारणे दिसून येतात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक चालकांवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल जिल्ह्यातील सर्व वाहनधारक कारचालकांनी याची नोंद घेऊन परिवार सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.