DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- साई खंडेराय
नांदेड :- लिमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून पळून जाणारे एका आरोपीस तात्काळ अटक करण्यात लिंबगाव पोलिसांना यश आले आहे. सदर फरार आरोपीस नारेश्वर येथून ताब्यात घेतले आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात 20 मे रोजी एका आरोपीने सदर अल्पवयीन मुलीवर शिवीगाळ करून अतिप्रसंग केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता लिमगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात मुलींच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले होते लिमगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवे यांनी या प्रकरणाचे गंभीर दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक केबी काजगीर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून सदर आरोपी यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी आदेश दिले होते. पोलीस उपनिरीक्षक केबी काजगीर यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की या प्रकरणातील आरोपी हा नाळेश्वर येथील एका उसाच्या शेतात लपून बसला आहे असे समजले पोलीस उपनिरीक्षक केबी काजगिर सूर्यवंशी काजी पदेवाड यांच्या पथकाने नाळेश्वर येथे सापळा रचून उसाच्या शेतात छापा टाकला असता आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव शंकर गौतम गच्ची असल्याचे सांगितले सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास लिमगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक उदय खंडेराय, धरणे उपविभाग अधिकारी बेनेगल, सहायक पोलीस निरीक्षक दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के बी काजगीर, सूर्यवंशी ,काजी, पदेवाड यांनी केली आहे.