नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ससूनच्या डॉ. तावरे व हाळनोर यांना अटक – अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
पुणे : कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोघांना पहाटे बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पलच बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट बदलला गेला. थेट रक्तच बदलल्यामुळे या केसची दिशाच बदलण्याची शक्यता होती.

सुदैवाने पोलिसांनी दुसऱ्यांदा त्या मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलेले होते आणि त्याची डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे. यातून हा सर्व प्रकार उघड झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाईचे सविस्तर प्लॅनिंग केलं आणि तावरे व हरनोर या दोघांना पहाटे त्यांच्या घरामधून अटक केली. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात देखील ससून रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा कथित सहभाग उघड झाला होता. त्यानंतर देखील ससूनमध्ये हे गैरप्रकार सुरू आहेत. डॉ अजय तावरे यांना नुकतेच एक रुग्ण उंदीर जाऊन दगावल्याच्या कारणावरून पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर देखील डॉ तावरे यांनी कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी मदत केली आणि त्याचे ब्लड सॅम्पल बदलले. या बदललेल्या रक्ताचा अहवाल त्यांनी दिला. डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाल्याची चर्चा आहे. या दोघांना कोणी संपर्क साधला? त्यांच्यापर्यंत पैसे कोणी पोहोचवले? याचा आता तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:01 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!