नाशिक जिल्ह्यातून साक्री परिसरात चोरी करण्याच्या इराद्याने आला होता
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री: दि. २४/०५/२०२४ रोजी साक्री पोलीस स्टेशनचे पोसई संदीप संसारे, पोकों/७४९ रोशन चित्ते, पोकॉ/१७५९ प्रमोद पांचाळ व चापोकॉ/५६६ धनंजय शामराव चौधरी असे एमएच १८ बीएक्स ०२२७ या शासकीय वाहनाने रात्रगस्त करीत असताना ०२:४५ वाजेच्या दरम्यान पंढरपुर(देवनगर)पेट्रोलपंप नजिक एक इसम चेहऱ्यावर काळा रूमाल बांधुन भरधाव वेगात मोटारसायकल शेवाळी फाट्याकडे जात असलेला त्यांच्या नजरेस पडला. तेंव्हा त्यांनी त्याला थांबविण्याचा इशारा केला असताना तो थांबला नाही. त्यामुळे पोलिसांनी लगेच त्या मोटारसायकलीचा पाठलाग करून शेवाळी फाट्याच्या अलीकडे थांबवली असता त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच ४१ एजे १७२३ हिरो होंडा स्पेलेडर प्रो काळ्या रंगाची जागीच सोडुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोकों/१७५९ प्रमोद पांचाळ यांनी गाडीतून खाली उतरत त्याला पकडले. व त्याला त्याचे नाव व इतक्या रात्री का फिरत आहे विचारले असता त्यांनी काहीएक सांगितले नाही. त्याच्या दोन्ही खिशात एक लाकडी काळ्या रबरी गीलोल लांबी अंदाजे दीड फुट, चार लहान लहान दगडे, एक सहा इंची लांबीचा एडजस्टेबल सकुव्हायव्हर त्यांची लांबी अंदाजे सहा इंच, व विवो कंपनीचा विवो १९०१ मॉडेलचा मोबाईल फोन त्याचा आईएमईआय क्रमांक ८६६१९१०४३४०२११४, ८६६१९१०४३४०२१०६ असा त्यामध्ये जिजो कंपनीचे सीम त्याचा क्रमांक असे त्याच्याजवळ आढळून आल्याने तो अपराध करण्याच्या तयारीत आहे असा साक्री पोलीसांना संशय आला त्यामुळे साक्री पोलिसांनी लागलीच त्याला त्याच्या मोटारसायकल सहित साक्री पोलीस ठाणे येथे घेऊन आले. त्यानंतर त्याला पोसई संदिप संसारे यांनी त्याचे नाव विचारले असता तेंव्हा त्याने त्याचे नाव हितेश सुरेश देवरे (वय १९) रा.दरेगाव पिंपळकोठे ता.बागलाण जि.नाशिक असे सांगितले, व त्याच्याकडे जी मोटारसायकल होती ती कोणाची आहे असे त्याला विचारले असता तो काहीएक माहिती देऊ शकला नाही. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल ७४९ रोशन महारू चित्ते यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ अन्वये साक्री पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला, तसेच अल्पवयीन आरोपी याकडे अधिक पोसई संदीप संसारे यांनी चौकशी केली असता त्याने आम्ही चौघे जण होतो व आम्ही चोरी करण्याच्या इराद्याने साक्री परीसरात फिरत होतो माझा एक साथीदार हा उदय हॉटेलपाशी लपून बसला आहे व दोन अन्य हे आम्ही शेवाळी गावातून चोरलेली स्पलेंडर मोटारसायकल घेवुन आमच्या गावी घेवून गेले आहे अशी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संसारे व त्याच्यांसोबत असलेल्या अमंलदारानी मोठ्या शिताफिने विधीसंघषीत बालक याला शेवाळी फाटा नजीक हॉटेल उदय जवळ पकडले व त्यानंतर पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व सपोनी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे, पोकॉ/७४९ रोशन चित्ते, पोकों / १७५९ प्रमोद पांचाळ व चापोकों/५६६ धनंजय शामराव चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल ८४५ अर्जुन खलाणे यांच्या पथकाने आरोपींच्या गावी जावुन आणखी दोन विधीसंघषीत बालक यांना ताब्यात घेतले व त्यांना साक्री पोलीस स्टेशनला घेऊन आले. व त्यांच्याकडून दोन स्पेलेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.
सदरची कामगिरी मा.श्री. श्रीकांत धिवरे साहेब पोलीस अधिक्षक धुळे, श्री. किशोर काळे अपर पोलीस अधिक्षक साहेब धुळे, श्री. साजन सोनवणे उपविभागीय अधिकारी धुळे ग्रामीण विभाग, हर्षवर्धन गवळी साहेब पोलीस निरीक्षक साक्री पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण पाटील, पोसई संदीप संसारे पोकों/७४९ रोशन चित्ते, पोकों/१७५९ प्रमोद पांचाळ व चापोकॉ/५६६ धनंजय शामराव चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल / ८४५ अर्जुन खलाणे यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/२२६० उमेश चव्हाण हे करीत आहेत.