DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम शाळेचा सुजल श्रीरामे हा विद्यार्थी 93.60 टक्के गुण मिळवीत तालुक्यातून प्रथम आला.
द्वितीय क्रमांक विद्यानिकेतनचा दिव्यांशू बनसोड व राष्ट्रीय विद्यालयाची कु. मोनिका नागोसे यांनी पटकावीला. दोघांनाही 93.20 टक्के गुण प्राप्त झालेत. तिसरा क्रमांक राष्ट्रीय विद्यालयाची कु. अंजली नागपुरे हिने प्राप्त केला. तिला एकूण 91.60 टक्के गुण मिळालेत.
विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली. भिवापूर एजयुकेशन सोसायटी बॉइज हायस्कुलचा निकाल 87.50 % एवढा लागला असल्याचे समजते.