सर्वेक्षण करणाऱ्यांना तुटपुंजे मानधन
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- मराठा समाजाचे मागासले पण तपासण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात 23 जानेवारी ते दोन फरवरी 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. भिवापूर तालुक्यात शिक्षक, तलाठी, नगरपंचायत कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण केले. त्यासाठी आयोगाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला दहा हजार पाचशे रुपये मानधन मंजूर करण्यात आले. दोन एप्रिल 2024 च्या जीआर नुसार आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बँक खात्यात मानधनाची रक्कम जमा केली. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कर्मचाऱ्यांना मानधनाची रकम देतांना मोठी कपात करण्यात आलेली आहे. कुणाला आठशे, कुनाला नऊशे, कुणाला हजार तर कुणाला दोन हजार असे मानधन देण्यात आले. ही रक्कम आज काही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. मानधनाचे प्रलोभन दाखवून आयोगाने कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले मात्र तुटपुंजे मानधन देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. जमा झालेले मानधन शासनाला परत करण्याचा इशारा घनश्याम बनसोड, मुकेश बोरकर, शैलेश वंजारी, रोशन गजभिये विनोद जोधे, सुषमा कडू आदींनी दिला आहे.